January 2018

प्रेषित मुहम्मद (स.) यांनी ईमान धारण करण्यासाठी ज्या शिकवणी दिल्या, त्यापैकी पाचवी शिकवण म्हणजे पारलौकिक जीवनावरील दृढ श्रद्धा होय. पारलौकिक जीवनासंबंधी ज्या गोष्टीवर श्रद्धा बाळगणे अगत्याचे आहे, त्या खालीलप्रमाणे,
एके दिवशी अल्लाह सर्व ब्रह्मांडाला व त्याने निर्मिलेल्या एकूण प्राणीमात्राला व वस्तूमात्राला नष्ट करून टाकील. त्या दिवसाला ‘कयामत’ (प्रलयकाळ) असे नाव आहे.
नंतर तो सर्वांना पुन्हा जिवंत करून दुसरे जीवन प्रदान करील. सर्वजण एके ठिकाणी ईश्वरासमोर आणले जातील. त्या दिवसाला ‘हश्र’ असे नाव आहे.
प्रत्येक माणसाने या जगातील जीवनात केलेल्या एकूण कर्माची नोंद असलेले दप्तर (अभिलेख) ईशन्यायालयात सादर केले जाईल.
ईश्वर प्रत्येक माणसाच्या पाप-पुण्याचे तंतोतंत मूल्यमापन करील. ईशतराजूत ज्याचे पुण्यकर्माचे पारडे पापकृत्याच्या पारड्यापेक्षा अधिक जड असेल त्याला क्षमा केली जाईल. उलट ज्याचे पापकृत्याचे पारडे, अधिक जड असेल त्याला शिक्षा होईल.
जे क्षमेस पात्र ठरतील, ते जन्नत (स्वर्ग लोक) मध्ये प्रवेश करतील व जे शिक्षेस पात्र ठरतील त्यांना ‘जहन्नम’ (नरकाग्नी) मध्ये झोकून दिले जाईल.
पारलौकिक जीवनावर ईमान व त्याची गरज आखिरत (पारलौकिक जीवन) वरील ही श्रद्धा जशी प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सादर केली आहे, तशीच ती आधीच्या सर्व प्रेषितांनीही केली होती. प्रत्येक काळात ती श्रद्धा निष्ठापूर्वक बाळगणे मुस्लिम होण्यासाठी एक आवश्यक अट राहिली आहे. या श्रद्धेचा ज्यांनी इन्कार केला अथवा तिच्याबद्दल संशय बाळगला, त्याला आधीच्या सर्व प्रेषितांनी ‘श्रद्धाहीन’ (काफिर) ठरविले आहे. कारण अशा श्रद्धेविना ईश्वरास, त्याच्या ग्रंथास व त्याच्या प्रेषितांस मानणे अगदी अर्थहीन ठरते आणि माणसाचे संपूर्ण जीवन बिघडून जाते. अंतर्मुंख होऊन चिंतन केल्यास ही गोष्ट तुमच्या चटकन लक्षात येईल. एखादे कृत्य करण्यास तुम्हास सांगितले जाते, तेव्हा पहिला प्रश्न जो तुमच्या मनात उद्भवतो तो हाच की, ते कृत्य केल्याने कोणते हित प्राप्त होईल व ते टाळल्यास काय हानी होईल? असा प्रश्न मनात का उद्भवतो? त्याचे वास्तविक कारण असे आहे की माणसाचा उपजत स्वभावधर्म असा आहे की ज्या कृत्यापासून काहीच निष्पन्न होत नाही, असे कृत्य त्याला निरर्थक वाटते. जे केल्याने कसलाही लाभ वा हित साधणारे नाही अशी तुमची खात्री असल्यास, ते कृत्य करण्यास तुम्ही कधीही प्रवृत्त होणार नाही. त्याचप्रमाणे ज्यापासून कसलीही हानी नाही, असे ठामपणे वाटल्यास तशा गोष्टीचे पथ्य पाळण्यासही तुम्ही तयार होणार नाही. अशीच अवस्था संशयाबद्दलही असते. ज्या कृत्याचे फळ प्राप्त होणे अनिश्चित असेल ते करण्यास तुम्हाला स्वारस्य वाटणार नाही. तसेच एखादे कृत्य हानिकारक असण्याबद्दल शंका असेल तर त्यापासून अलिप्त राहाण्यास तुम्ही विशेष प्रयास करणार नाही. लहान मुलांवर नजर टाका. ते विस्तवाला का धरतात? विस्तव जाळणारी, भाजणारी वस्तू आहे या गोष्टीची खात्री त्यांच्या मनावर उमटलेली नसते. एवढ्याचसाठी ते असे करतात ना? ते विद्यार्जनाचे कष्ट का चुकवीत असतात? त्यांची वडीलधारी माणसे विद्येची जी महती व तिचे जे काही फायदे त्यांना सांगत असतात, ते सर्व त्यांच्या मनात पटत नाहीत. याचसाठी ते असे वागतात का? यावरूनच असा विचार करा की जी व्यक्ती आखिरत (पारलौकिक) वर श्रद्धा बाळगत नसेल तर ती ईश्वरेच्छेला व ईश्वरेच्छेनुसार आचरणाला निरर्थक व निष्फळ मानते. त्याच्या दृष्टीनुसार ईशआज्ञापालनाचा कोणताही लाभ नाही. तसेच ईश्वराची अवज्ञा केल्यास कसलीही हानी होणारी नसते. मग ईश्वराने आपल्या प्रेषितांकरवी व आपल्या ग्रंथाद्वारा दिलेले आदेश व आज्ञा यांचे पालन करणे त्याला कसे शक्य आहे? समजा, त्याने ईश्वराचे अस्तित्व मान्यही केले तरी असे मानणे व्यर्थ असेल कारण तो ईश्वराच्या आज्ञांचे पालन करणार नाही व तो ईश्वरेच्छेनुसार आचरण करणार नाही.
परंतु ही बाब येथेच संपत नाही. आणखी जरा विचार केलात तर तुम्हाला हे कळून चुकेल की, पारलौकिक जीवनावरील श्रद्धा बाळगणे अगर न बाळगणे या गोष्टीचा माणसाच्या जीवनावर अत्यंत निर्णायक ठसा उमटतो. आम्ही वर सांगितलेच आहे की, मनुष्यस्वभावधर्मच असा आहे की, तो कोणतेही कृत्य करण्याचा अगर न करण्याचा निर्णय त्या कृत्याच्या लाभ अगर हानीच्या दृष्टीने करीत असतो. एक मनुष्य असा आहे की, त्याची दृष्टी केवळ या जगातील लाभावर व हानीवर खिळलेली आहे. तो असे कोणतेही सत्कृत्य व पुण्य-कर्म करण्यास प्रवृत्त होणार नाही ज्यापासून या जगात कसलाही लाभ होण्याची आशा नाही. त्याचप्रमाणे असे दुष्कृत्य व पापकर्म करण्यापासूनही परावृत्त होणार नाही ज्यामुळे त्याला या जगात कसलीही हानी होण्याची भीती नाही. आता दुसरा एक असा मनुष्य घ्या, ज्याची दृष्टी आपल्या कृत्यांच्या व कर्माच्या अंतिम परिणामांवर खिळलेली आहे. तो या जगातील लाभ व हानी यांना हंगामी स्वरूप मानील व पारलौकिक जीवनातील चिरकाल स्वरूपाच्या हितांवर व हानीवर सतत दृष्टी ठेवून सन्मार्गाचा स्वीकार करील व कुमार्गाचा त्याग करील. या नश्वर जगात, सन्मार्ग अनुसरल्याने कितीही मोठे नुकसान झाले अगर कुमार्गाने कितीही मोठा लाभ होणार असेल तरी तो अविचल राहील. या दोन व्यक्तीत किती मोठा फरक पडला ते पाहा. एक मनुष्य सत्कृत्य या गोष्टीला मानतो की, या अल्प जीवनकाळात त्याचे फळ त्याला तेथेच मिळते. उदा. धनप्राप्ती, जमीन-जुमला मिळणे, हुद्दा व अधिकारप्राप्ती, नावलौकिक मिळणे, जनमाणसात कौतुक व प्रशंसा होणे व त्यामुळे समाधानाचा आस्वाद व आनंद प्राप्त होणे, तसेच इच्छावासनाची तृप्ती, पाशवी प्रवृत्ती तृप्त होणे इ. इ. तसेच असा मनुष्य दुष्कृत्य व कुकर्म अशाच कृत्याला मानील ज्याच्यामुळे कोणतीही हानी अगर दुष्परिणाम याच जीवनात घडून येतील अगर घडून येण्याचा संभव असेल. उदा. जीवित व वित्त हानी, आरोग्य नष्ट होणे, अपकीर्ति, शासनाकडून होणाऱ्या शिक्षा, कोणत्याही प्रकारचा त्रास, दुःख अगर औदासिन्य प्राप्त होणे वगैरे.
याच्या तुलनेत दुसरा मनुष्य सत्कर्म अशा गोष्टीस मानतो, जे केल्याने ईश्वराची प्रसन्नता प्राप्त होते व दुष्कृत्य म्हणजे जे केल्याने ईश्वराची अप्रसन्नता व कोप होतो. सत्कृत्य केल्याने त्याला या जगात कसलाही लाभ प्राप्त होत नसला व उलट त्याला अधिकाधिक हानीच होत गेली, तरी असा मनुष्य सत्कृत्याला सत्कृत्यच मानतो. तो अशी दृढश्रद्धा बाळगून असतो की, सरतेशेवटी परमकृपाळू ईश्वर त्याला चिरकाल टिकणारा लाभ प्रदान करीलच. त्याचप्रमाणे दुष्कृत्य करून या जगात कसलीही हानि अगर नुकसान होणारे नसले अगर तसे होण्याचा धोकाही नसला, उलट त्यापासून उघड उघड लाभच दृष्टीस पडत असेल तरी असा मनुष्य दुष्कृत्याला दुष्कृत्यच मानतो. तो अशी दृढश्रद्धा बाळगतो की, मी या क्षणभंगूर जगातील जीवनकाळात कसलीही शिक्षा होण्यापासून वाचलो व काही काळ जरी आनंद भोगला तरी सरतेशेवटी ईशकोपापासून काही मी वाचणार नाही.
हे दोन भिन्न विचार असून त्यांच्या प्रभावाने माणसे दोन वेगवेगळे मार्ग अनुसरतात. जी व्यक्ती पारलौकिक जीवनावर दृढश्रद्धा बाळगत नाही तिला हे कदापिही शक्य होणार नाही की, इस्लामच्या जीवनपद्धतीने ती एक पाऊलही टाकू शकेल. इस्लाम असे सांगतो, ‘‘असहाय्य व गांजलेल्यांना ईशमार्गात ‘जकात’-दान करा.’’ तर या विचारप्रणालीचा मनुष्य असे म्हणतो, ‘‘दान केल्याने माझे धन कमी होईल. मी तर माझ्या पैशाचे पुरेपूर व्याज मिळवीन व व्याजापोटी जप्ती, हुकूमनामे मिळवून गोरगरीबांच्या संसारातील लहान सहान वस्तूंचाही लिलाव करवीन.’’ इस्लामचे असे सांगणे आहे, ‘‘नेहमी खरे बोला व असत्यापासून दूर राहा, मग सत्य बोलल्याने केवढेही नुकसान होवो अगर असत्य बोलल्याने कितीही मोठा लाभ होवो.’’ या विचारधारणेचा विरोधी मनुष्य असे उत्तरतो, ‘‘नुसत्या सत्याला घेऊन मी काय करू ज्यामुळे माझा केवळ तोटाच होतो, नफा मात्र काहीच नसतो. तसेच अशा असत्यापासून मी काय म्हणून परावृत्त व्हावे, जे लाभकारक असेल व ज्यात अपकीर्तीचा कोणताही धोका असणार नाही?’’ तो एखाद्या निर्जन मार्गांने जात असतो, तेव्हा एखादी बहुमूल्य वस्तू रस्त्यात पडलेली दृष्टीस पडते. इस्लाम असे म्हणतो, ‘‘ती काही तुझी मालमत्ता नाही, म्हणून ती तू कदापिही घेऊ नये.’’ हा मनुष्य म्हणतो, ‘‘फुकटात मिळत असलेली वस्तू मी काय म्हणून सोडून द्यावी? येथे कोणीही पाहात नाही व पोलिसांना वर्दी देणारा नाही अगर कोर्टात साक्ष देऊन माझी बदनामी करू शकेल असाही कोणी नाही. मग त्या वस्तुचा मी काय म्हणून लाभ घेऊ नये?’’ एखादी व्यक्ती गुप्तपणे अशा माणसाजवळ एखादी रक्कम ठेव म्हणून ठेवते व मरण पावते, अशा परिस्थितीत इस्लामचे असे सांगणे आहे, ‘कोणाच्याही ठेवींचा अपहार करू नका. ती ठेव त्याच्या संततीला परत करून टाका.’ हा मनुष्य म्हणतो की, ‘‘काय म्हणून मी असे करावे? निधन पावलेल्या व्यक्तीची ठेव माझ्याजवळ आहे असे सिद्ध करणारा कसलाही पुरावा नाही अगर कोणी साक्षीदारही नाही, खुद्द त्याच्या मुलाबाळांनाच ती गोष्ट ठाऊक नाही, ती ठेव जर मी विनासायास गिळंकृत करून पचवू शकतो व कसल्याही दाव्याची अगर बदनामीचाही धोका नाही, तर मी ती ठेव काय म्हणून पचवू नये?’’
तात्पर्य असे की, जीवनमार्गात पावलोपावली इस्लाम त्याला एका जीवनपद्धतीने आचरण करण्याचा आदेश देईल व असा मनुष्य नेमका त्याविरुद्ध मार्ग अनुसरेल. त्याचे कारण असे की इस्लाममध्ये प्रत्येक गोष्टीचे मूल्यमापन पारलौकिक जीवनातील चिरकालच्या लाभहानीच्या परिणामाच्या दृष्टीने होते, परंतु हा मनुष्य प्रत्येक बाबतीत या जगातील क्षणभंगूर जीवनकाळात प्राप्त होणाऱ्या परिणामावर दृष्टी ठेवून असतो.
आता तुमच्या हे लक्षात आलेच असेल की, ‘आखिरत’ (पारलौकिक जीवन) वर दृढश्रद्धा धारण केल्याविना मनुष्य मुस्लिम (आज्ञाधारक) का होऊ शकत नाही. मुस्लिम होणे तर फार मोठी गोष्ट आहे. परंतु सत्य तर असे आहे की, पारलौकिक जीवनाचा इन्कार माणसाचे मानवतेपासून अधःपतन करून त्याला पशूपेक्षाही खालच्या दर्जावर नेऊन सोडतो.
पारलौकिक जीवनावरील श्रद्धेची (ईमान) सत्यता:-
पारलौकिक जीवनावरील श्रद्धेची आवश्यकता व तिचे फायदे आपणास कळले. आता आपण संक्षिप्तपणे हे पाहू या की, प्रेषित मुहम्मद (स.) यांनी पारलौकिक जीवनावरील श्रद्धेचे जे वर्णन केलेले आहे, तीच गोष्ट बुद्धिप्रामाण्यावरही खरी असल्याचे दिसून येते. खरे तर आमची ही श्रद्धा केवळ प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या विश्वासार्हतेवर आधारलेली असून ती बुद्धिप्रामाण्यावर आधारलेली नाही. तरी आम्ही जेव्हा विचार व चिंतन करतो तेव्हा, पारलौकिक जीवनाच्या संदर्भात अन्य सर्व श्रद्धांपेक्षा हीच श्रद्धा बुद्धिनुसार असल्याचे आढळून येते.

पारलौकिक जीवनासंबंधी आज जगामध्ये तीन वेगवेगळ्या प्रकारच्या विचारप्रणाली व श्रद्धा असल्याचे आढळून येतात.
एक समूह असे म्हणतो की, मृत्यूनंतर मनुष्य नाश पावतो. त्यानंतर कसलेही जीवन नाही. अशी विचारधारणा नास्तिकांची आहे व ते स्वतः विज्ञाननिष्ठ असल्याचा दावा करतात.
दुसरा समूह असे सांगतो की, मनुष्य आपल्या कर्माची फळे भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा या जगात जन्म घेत असतो. या जन्मात त्याने कुकर्मे केली तर पुढच्या जन्मात एखाद्या पशूचा जन्म घेतो. उदा. कुत्रा, मांजर. वगैरे अथवा वृक्षाच्या वा एखाद्या शूद्रातिशूद्र माणसाचा जन्म घेतो. याउलट सत्कर्मे केली असतील तर अधिक उच्च व श्रेष्ठ श्रेणीत तो जन्म घेतो. अशी श्रद्धा बहुतेक करून अपरिपक्व धर्मामध्ये असलेली आढळते.
तिसरा समूह ‘कयामत’ (प्रलयकाळ), ‘हश्र’ (पुनरुज्जीवन) व ईश न्यायालयात हजेरी, तसेच ईश पुरस्कार व शिक्षा या बाबीवर ईमान बाळगतो. हीच श्रद्धा सर्व प्रेषितांची होती व त्याबद्दल त्यांच्यात कसलेही दुमत नव्हते.

आता पहिल्या समूहाच्या श्रद्धेबद्दल थोडा विचार करु या. या लोकांचे असे म्हणणे आहे की, मृत्यूनंतर कोणीही पुन्हा जिवंत झाल्याचे आम्ही पाहिले नाही. जो मृत्यू पावतो तो मातीत मिसळून जाऊन नष्ट होतो, एवढेच आम्हाला दिसते. म्हणून मृत्यूपश्चात कोणतेही जीवन नाही. परंतु जरा विचार करून पाहा. हा काय युक्तिवाद झाला? मृत्यूनंतर कोणी जिवंत झाल्याचे तुम्ही पाहिले नाही तर जास्तीत जास्त तुम्ही असे म्हणू शकता की, ‘‘मरणोत्तर काय होणार ते आम्ही जाणत नाही.’’ यापुढे जाऊन तुम्ही जो असा दावा करता की, ‘‘आम्ही हे जाणतो की, मरणोत्तर काहीही होणार नाही.’’ याला तुमच्याजवळ कोणता आधार अगर पुरावा आहे? एखाद्या अडाणी माणसाने जर विमान पाहिले नसेल तर तो म्हणू शकतो की, ‘‘विमान कसले असते, हे मला ठाऊक नाही.’’ परंतु जेव्हा तो म्हणतो की, ‘‘विमान ही कोणतीही वस्तु मुळातच नाही, हे मी जाणतो.’’ तर कोणताही शहाणा मनुष्य त्याला मूर्ख म्हणेल. याचे कारण असे की, त्याने एखादी वस्तु डोळ्यांनी पाहिली नसेल तरी तो असा दावा करु शकत नाही की, त्या वस्तूचे मुळातच अस्तित्वच नाही अगर ती असू शकतच नाही.
यानंतर दुसऱ्या श्रद्धेबद्दल चिंतन करु या. या श्रद्धेचा सार असा आहे की, आज जी व्यक्ती माणसाच्या रूपात दिसते. तिने माणसाचे रुप एवढ्यासाठीच प्राप्त केले की, जेव्हा तो प्राणीरुपात होता तेव्हा त्याने सदाचार करून पुण्यसंचय केला होता. तसेच आज जो पशूरुपात दिसतो तो त्या पशूरुपात केवळ यासाठीच गेला की, मानवरुपात असताना त्याने दुराचार व दुष्कृत्ये करून पापसंचय केला होता. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर मानवजन्म, पशूयोनी अगर वृक्षजन्म वगैरे सर्व काही पूर्व जन्मातील कर्माचे फळ होय.
आता प्रश्न असा उद्भवतो की, सर्वांत आरंभी आत्म्याचे रुप कोणते होते? आरंभी मानवजन्म होता असे म्हटले तर त्या अगोदर पशू अगर वृक्षरुप होते असे मानावे लागेल. मानवीरुप जे मिळाले ते कोणत्या सत्कर्माचे फळ म्हणून? आरंभीच आत्म्याचे रुप पशूचे अगर वृक्षाचे होते. असे म्हटले तर त्यापूर्वी मानवीरुप होते हे मान्य करावे लागेल. तसे न मानल्यास प्रश्न असा उद्भवतो की, पशूचा जन्म अथवा वृक्षाचे रूप त्याला कोणत्या दुष्कर्माची शिक्षा म्हणून प्राप्त झाले? तात्पर्य असे की, ही श्रद्धा मानणारे लोक ब्रह्मांडातील निर्मित वस्तुच्या उत्पत्तीचा प्रारंभ कोणत्याही रुपातून झाल्याचे ठरवू शकत नाहीत. त्याचे कारण असे की, प्रत्येक जन्माआधी पूर्वीचा जन्म असणे आवश्यक ठरते जेणेकरून नंतरचा जन्म म्हणजे पूर्वीच्या जन्मातील कर्मांचे फळ म्हणून ठरविले जावे. ही गोष्ट स्पष्टपणे बुद्धिविरुद्ध आहे.
आता तिसऱ्या प्रकारची श्रद्धा पाहा. सर्वप्रथम तिच्यात असे वर्णिले गेले आहे की, ‘‘एके दिवशी ‘कयामत’ येईल व विश्वनिर्माता ईश्वर हे ब्रह्मांड नष्ट करून टाकील आणि मुळापासून एका उच्च श्रेणीची व चिरकाल टिकणारी अशी नवी व्यवस्था प्रस्थापित करील. ही गोष्ट इतकी ठाम आहे की, तिच्या खरेपणाबद्दल यत्किंचितही संशय अगर शंका बाळगण्यास वाव नाही. विश्वातील व्यवस्थेबद्दल जितके अधिक चिंतन करावे तितकेच जास्त प्रमाणात या गोष्टीचा पुरावा मिळतो की, ही एकूण व्यवस्था चिरकाल टिकणारी व अनंत नाही. कारण असे की, ज्या काही शक्ती या व्यवस्थेमध्ये कार्यरत आहेत त्या सर्वांनाच मर्यादा असून त्या एके दिवशी संपणे अगदी निश्चित आहे. म्हणूनच सर्व वैज्ञानिक शास्त्रज्ञांचे असे एकमत झालेले आहे की, एके दिवशी सूर्याची उष्णता व प्रकाश पूर्णपणे लोप पावून तो थंड पडेल. ग्रह तसेच तारे एकमेकांवर आदळतील व हे संपूर्ण ब्रह्मांड नष्ट होईल.
या श्रद्धेतील दुसरी बाब अशी सांगितली गेली आहे की, ‘‘सर्व मानवांना मरणोत्तर पुन्हा एकदा जिवंत केले जाईल. हे एक असे सत्य आहे ज्याचे घडण्यात कसलीही शंका घेण्यास वाव नाही. तरी हे शक्य आहे काय? तशी गोष्ट घडणे जर अशक्य मानले तर मानवाला लाभलेले हे प्रस्तुत जीवन कसे शक्य झाले? ज्या ईश्वराने मानवाला या जगात जन्म प्रदान केला आहे. तो पारलौकिक जीवनाच्या नवीन व्यवस्थेमध्येही मानवाला जन्माला घालू शकतो. हे अगदी उघड आहे. तिसरी बाब अशी की, ‘‘मानवाने या जगातील, जीवनकाळात जे आचरण केले आहे, जी सत्कर्मे व कुकर्मे केली आहेत त्या सर्वांची इत्यंभूत नोंद केली गेली असून ती जपून ठेवण्यात आली आहे व त्या नोंदीचे दप्तर ‘हश्र’ (पुनरुत्थान) च्या दिवशी हजर केले जाईल. या गोष्टीचा पुरावा आज या जगातही आम्हाला प्राप्त होत आहे. पूर्वीच्या काळी असा एक समज होता की, आपल्या मुखातून जो ध्वनी बाहेर पडतो तो हवेत थोड्याशा लहरी निर्माण करून कायमचा नष्ट होतो परंतु वैज्ञानिक संशोधनाने आता असे कळून चुकले आहे की, प्रत्येक ध्वनि आपल्या सभोवतालच्या वस्तूंवर आपला कायमचा ठसा उमटून मागे सोडतो व तो ठसा पुनर्ध्वनित केला जाऊ शकतो. म्हणून याच तत्त्वावर ग्रामोफोनची तबकडी निर्माण करण्यात आली आहे. यावरूनच हेही कळून चुकते की, आपल्या सभोवताली असलेल्या ज्या चराचर वस्तूंवर ध्वनिलहरी आदळत आहेत, त्या सर्व वस्तूंवर तुमच्या प्रत्येक कृतीचा ठसा उमटत आहे. वस्तुस्थिती जर अशी आहे की तुमच्या सर्व कृत्यांच्या नोंदीचे दप्तर व्यवस्थितपणे जपून ठेवले गेले आहे आणि पुराव्यादाखल ते पुन्हा सादर केले जाऊ शकते. ही गोष्ट अगदी खात्रीपूर्वक व निश्चित असल्याचे उमगते.
चौथी बाब अशी की, ‘‘ईश्वर ‘हश्र’च्या दिवशी काटेकोर न्यायाने तुम्हाला सत्कर्माची फळे तसेच कुकर्माची शिक्षा देईल.’’ हे अशक्य असल्याचे कोण म्हणू शकतो? यातील काय काम बुद्धीविरुद्ध आहे? सारासार बुद्धी व विचारशक्ती तर असेलच इच्छिते की, ‘‘एकदा कधीतरी ईशन्यायालय भरायला हवे व काटेकोर न्यायपद्धतीने सर्व कर्माचा न्यायानिवाडा व्हायला हवा. कोणीतरी एखादी व्यक्ती सत्कर्मे करते व त्याचा कोणताही मोबदला त्या व्यक्तीला य जगात प्राप्त होत नाही, असे आम्ही डोळ्यांनी पाहतो. दुसरी एखादी व्यक्ती अनेक कुकर्मे करीत असते तरी त्यापासून त्या व्यक्तीला कसलीही हानी या जगात भोगावी लागत नाही, हेही आपण डोळ्यांनी पाहात असतो. इतकेच नव्हे तर अशीसुद्धा सहस्त्रावधी उदाहरणे पाहातो की एखाद्याने सत्कर्म करून उलट त्याचा तोटाच होत असतो. त्या उलट दुसरा एखादा कुकर्मे करूनही मौजमजा लुटत जगत असतो. असे प्रकार पाहिल्यानंतर सारासार विचारशक्तीची अशी इच्छा व अपेक्षा असते की सदाचारी माणसाला त्याच्या सत्कर्माची व दुराचारी माणसाला त्याच्या कुकर्माची फळे मिळणे अगदी अगत्याचे व आवश्यक आहे.
या श्रद्धेमधील शेवटची बाब ‘जन्नत’ (स्वर्ग) व ‘जहन्नम’ (नरकाग्नी) यांची अस्तित्वाची सत्यताही अशक्य नाही. विश्वनिर्माता ‘अल्लाह’ सूर्य, चंद्र, पृथ्वी, मंगळ वगैरे जर निर्माण करू शकतो तर ‘जन्नत’ व ‘जहन्नम’ त्याने निर्माण न करण्याला कोणती कारणे आहेत? तो जर न्यायनिवाडा करणार व मानवांना सत्कर्माची योग्य फळे व कुकर्माची शिक्षा देणार आहे तर बक्षीसाची फळे प्राप्त करण्यासाठी प्रतिष्ठादायक आनंद व आस्वाददायक स्थान असणे क्रमप्राप्त आहे व शिक्षा भोगण्यासाठी अवमानजनक तसेच दुःख, यातना व क्लेशदायक ठिकाणही असणे अगत्याचे आहे.
या सर्व बाबींचा जेव्हा तुम्ही खोल विचार व चिंतन कराल तर तुमची बुद्धीच तुम्हाला अशी ग्वाही देईल की माणसांच्या अंतिम परिणामाच्या संदर्भात जितक्या वेगवेगळ्या श्रद्धा जगात आढळतात, त्यापैकी मनाला पूर्णपणे पटणारी अशी केवळ हीच श्रद्धा असून तिच्यात कोणतीही गोष्ट बुद्धीविरुद्ध अगर अशक्यप्राय नाही.
तर जेव्हा हे प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या सारख्या सच्चा प्रेषिताने सांगितली आहे आणि त्यात जर सर्वस्वी तुमचेच हित व कल्याण आहे तर त्यावर दृढ विश्वास बाळगणे क्रमप्राप्त ठरते आणि कसल्याही युक्तिवादाविना व आधाराविना तिच्याबद्दल शंका बाळगू नये, यातच शहाणपणा आहे.

अल्लाहवर ईमान धारण केल्यानंतर (दृढ श्रद्धेनंतर) प्रेषित मुहम्मद (स.) यांनी ईमान धारण करण्यासाठी शिकवण दिलेली दुसरी अट म्हणजे ईशदूतांचे अस्तित्व आहे. या श्रद्धेचा मोठा लाभ हा आहे की अनेकेश्वरत्वाच्या सर्व धोक्यांपासून मनुष्य दूर राहतो.

आपणास हे माहीत आहेच की अनेकेश्वरवाद्यांनी ईशत्वामध्ये दोन प्रकारच्या निर्मित वस्तूंचा समावेश केला आहे. त्या निर्मित वस्तूंचा एक प्रकार म्हणजे रूप व आकार तसेच देह असणाऱ्या वस्तू-प्राणी होत. उदा. चंद्र, सूर्य, तारे, अग्नि, जल तसेच महान सत्पुरुष वगैरे. दुसरा प्रकार म्हणजे ज्यांना रूप व आकार नाही अशा शक्ती, त्या शक्ती माणसाला दिसू शकत नाही पण अदृश्यपणे विश्वातील घडामोडीत कार्यरत असतात. उदा. वारे वाहवणारी शक्ती, पर्जन्य वर्षाव करणारी शक्ती, प्रकाश देणारी शक्ती वगैरे वगैरे. या गोष्टीपैकी पहिला प्रकार तर माणसांच्या डोळ्यांना दिसत असतो. म्हणून ते ईश्वर असण्याचा समज खुद्द ‘ला इलाहा इल्लल्लाह’ च्या शब्दांनीच निषेधार्ह व रद्दबातल ठरतो. परंतु दुसरा प्रकार अदृश्य व गूढमय आहे. अनेकेश्वरवादी लोक अधिकांश त्यांच्यावरच श्रद्धा बाळगत असतात. त्यांनाच देव-देवता व देवांची संतती मानत असतात. त्यांच्याच काल्पनिक रूपांची मूर्ती घडवून त्यांनाच नैवेद्य व भेटवस्तू अर्पण करतात. म्हणूनच एकेश्वरत्वास या अनेकेश्वरत्वाच्या दुसऱ्या प्रकारापासून निर्मळ व स्वच्छ करण्यासाठी एक स्थिर व अढळ तत्त्व वर्णिले गेले आहे.

अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) यांनी आम्हाला हे दाखवून दिले आहे की, ज्या अदृश्य व तेजस्वी शक्तींना तुम्ही ईश्वर अगर ईश्वराची संतती समजता, त्या वास्तविकपणे ईश्वराचे दूत (फरिश्ते) आहेत. ईशत्वात त्यांचा कसलाही सहभाग वा हस्तक्षेप नाही. ते सर्व ईश्वराच्या अधीन आहेत व ते इतके आज्ञाधारक आहेत की, ईशआदेशांची किंचितही अवज्ञा करू शकत नाहीत. ईश्वर त्यांच्याद्वारा आपल्या साम्राज्याचा प्रबंध करीत आहे व ते फरिश्ते ईश्वराची आज्ञा तंतोतंत पाळत असतात. स्वेच्छेने काहीही करण्याचा त्यांना अधिकार नाही. ते स्वबळाने ईश्वराच्या सेवेत कसलाही प्रस्ताव सादर करू शकत नाही. ईश्वरापुढे कोणाच्याही वतीने शिफारस करण्याची त्यांची हिंमत नाही. त्यांची उपासना करणे व त्यांची करूणा भाकणे ही गोष्ट तर मानवाला लांच्छनीय आहे. कारण प्रथमदिनी ईश्वराने त्या सर्वांकडून प्रथममानव आदम (अ.) यांना सजदा (वंदन) करावयास लावले होते. त्यांच्याहून अधिक ज्ञान व जाण आदम (अ.) यांना प्रदान केले होते. त्या सर्वांना (फरिश्त्यांना) वगळून आदम (अ.) यांना पृथ्वीवरील खिलाफत (प्रतिनिधित्व) बहाल केले होते. म्हणून जो मानव फरिश्त्यासाठी (दूत) वंदनीय केला गेला होता, खुद्द त्यानेच उलट फरिश्त्याची (दूत) करूणा भाकणे व सहाय्यार्थ याचना करणे यापेक्षा अधिक लांच्छनीय व अवमानकारक बाब आणखी कोणती असू शकते?

प्रेषित मुहम्मद (स.) यांनी एकीकडे तर फरिश्त्यांची (दूत) उपासना करण्यापासून व त्यांना ईशत्वामध्ये सहभागी ठरविण्यापासून आम्हाला रोखले; पण दुसरीकडे त्यांनी आम्हाला असे दाखवून दिले की फरिश्ते हे ईश्वराची श्रेष्ठ निर्मिती असून ते पूर्णपणे पापविरहित आहेत. त्यांचा प्राकृतिक गुणधर्मच असा आहे की ते ईश्वराची अवज्ञा करूच शकत नाहीत. ते सतत ईशदास्यत्व करण्यात व त्याची उपासना करण्यात मग्न असतात. या फरिश्त्यांपैकी एक महान फरिश्त्याकरवीच ज्यांचे नाव जिब्रईल (अ.) असे आहे; ईश्वराने प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यावर कुरआनमधील वचनांचे अवतरण केले. या फरिश्त्यांपैकीच असेही फरिश्ते आहेत जे अहर्निश तुमच्या समवेत हजर असतात व सतत आपली सत्कृत्ये व दुष्कृत्ये पाहात असतात. तुमच्या मुखातून बाहेर पडणारे चांगले तसेच वाईट शब्द ऐकत असतात व त्याची नोंद करीत असतात. प्रत्येक माणसाच्या जीवनातील कृत्यांचे रेकार्ड (अभिलेख) त्यांच्यापाशी सुरक्षित राखले जाते. पारलौकिक जीवनात जेव्हा तुम्हाला ईश्वरासमोर हजर केले जाईल त्यासमयी तुमचे हे दप्तर तेथे सादर केले जाईल. संपूर्ण आयुष्यात तुम्ही उघड उघड वा गुप्तपणे जी काही सत्कृत्ये व दुष्कृत्ये केली असतील त्या सर्वांच्या नोंदी त्या दप्तरात असतील, हे तुम्हाला दिसून येईल.

फरिश्त्याची वास्तव हकीकत आम्हाला दाखविण्यात आलेली नाही. केवळ त्यांचे गुणधर्म आम्हाला दाखविण्यात आले आहेत. त्यांच्या अस्तित्वावर दृढ श्रद्धा बाळगण्याचा आदेश दिला गेला आहे. फरिश्ते कसे आहेत व कसे नाहीत हे जाणून घेण्याचे साधन आमच्याकडे नाही. म्हणून स्वतःच्या बुद्धीने त्यांच्यासंबंधी एखादे मत वा धारणा करून घेणे हा घोर अज्ञानीपणा आहे. तसेच त्यांचे अस्तित्वच नाकारणे म्हणजे कुफ्र (अधर्म) आहे. कारण तसा इन्कार करण्यास कोणाकडे कसलाही युक्तिवाद नाही. अशा इन्काराचा अर्थ प्रेषित मुहम्मद (स.) यांना खोटे ठरविणे असा होतो. आम्ही फरिश्त्यांच्या अस्तित्वाची श्रद्धा केवळ याचसाठी बाळगतो की ईश्वराचे सच्चे व सत्यनिष्ठ प्रेषित मुहम्मद (स.) यांनी आम्हाला त्यांची माहिती दिली आहे.

इस्लामी शरिअत मानवी जीवनाला कशा प्रकारे एका सर्वोत्तम शिस्तबद्धतेचा पाईक बनविते, तसेच त्या शिस्तबद्धतेत किती लाभकारक गोष्टींचा व तत्त्वदर्शितेचा समावेश आहे हे आपणास कळून येईल.
शरिअतची तत्त्वे 
तुम्ही स्वतःच्या स्थितीचे चिंतन केले तर तुम्हाला असे कळून चुकेल की या भूतलावर येताना तुम्ही अनेक प्रकारच्या शक्ती जन्मतःच घेऊन आलेले आहात. प्रत्येक प्रकारची शक्ती व क्षमतेची अशी हाक आहे की तिचा यथोचित वापर केला जावा. तुम्हाला बुद्धी आहे, निश्चयशक्ती आहे. इच्छा-आकांक्षा आहे, दृष्टीं, श्रवणशक्ती, चव, स्पर्शज्ञान इत्यादी पंचेंद्रियांची शक्ती, क्षमता आहेत. हातापायात बळ आहे, तिरस्कार व क्रोध आहे. शोक व प्रेम आहे, भय व लोभ, मोह आहे. या सर्वातील कोणतीही शक्ती व क्षमता अकारण नाही. हे सर्व तुम्हाला याचकरिता दिले गेले आहे की तुम्हाला त्यांची गरज आहे. तुमचा स्वाभाविक प्रकृतीधर्म व नैसर्गिक स्वभावधर्म ज्या गोष्टींची मागणी करीत असतो त्याची पूर्तता करण्यातच तुमचे जीवन व जीवनाची सफलता अवलंबून आहे. हे त्याचवेळी शक्य होईल जेव्हा ईश्वराने प्रदान केलेल्या या सर्व शक्ती तुम्ही उपयोगात आणाल.

नंतर तुम्हाला असेही आढळून येईल की ज्या काही शक्ती व क्षमता तुम्हाला दिल्या गेल्या आहेत त्या सर्वांचा वापर करण्याची साधनेही तुम्हाला दिली गेली आहेत. सर्वप्रथम तुमचे स्वतःचे शरीर आहे; ज्यामध्ये सर्व आवश्यक इंद्रिये व अवयव आहेत. तसेच तुमच्या सभोवतालचे जग आहे व त्यामध्ये हरप्रकारची अगणित साधने विखुरलेली आहेत. तुमच्या सहाय्यासाठी तुमच्याचसारखी अन्य माणसे आहेत. तसेच तुमच्या सेवेसाठी प्राणी, वनस्पती व अवजड वस्तू आहेत. जमीन, पाणी, हवा, प्रकाश व उष्णता व याच प्रकारच्या अगणित बाबी आहेत. त्यांचा तुम्ही वापर करावा व आपले जीवन व्यतीत करण्यासाठी त्यांचा उपयोग करून घ्यावा, यासाठीच ईश्वराने या सर्व गोष्टींची निर्मिती केली आहे.

आता दुसऱ्या एका दृष्टिकोनातून पाहा. तुम्हाला ज्या शक्तीक्षमता दिल्या गेल्या आहेत त्या हितासाठी आहेत, हानीसाठी नव्हे. त्यांच्या यथोचित उपयोगाचे स्वरूप हेच असू शकते की त्यापासून हानी अजिबातच होऊ नये किंवा जेवढी अढळच असेल तितकीच हानी व्हावी. याखेरीज इतर जितकी स्वरूपे असतील ती चुकीचीच असावीत असा बुद्धीचा संकेत आहे. उदाहरणार्थ, एखादे कृत्य केल्याने तुम्हाला स्वतःच जर हानी होणार असेल तर तेही चुकीचे आहे. आपल्या शक्ती-क्षमतांचा वापर करून जर तुम्ही असे एखादे कृत्य केले ज्यामुळे इतरांना ते हानिकारक ठरेल तर तेही चूकच आहे. जर आपल्या शक्तीक्षमतांचा वापर तुम्ही अशा रीतीने कराल की ज्यायोगे तुम्हाला उपलब्ध असलेली साधने वाया जातील तर तसे करणेही चूक ठरेल. हानी, मग ती कसल्याही प्रकारची असो, ती टाळलीच पाहिजे, अशीच ग्वाही तुमची विवेकबुद्धी देईल. जर हानी टाळणे अजिबात शक्यच नसेल किंवा त्या हानीच्या पर्याप्त व परिणामस्वरूप एखादे मोठे हित साधले जाणार असेल, केवळ अशाच अवस्थेत हानी सहन केली जाऊ शकते.

आणखी पुढे जाऊ या. जगात माणसांचे दोन प्रकार आढळून येतात. जी माणसे आपल्या काही शक्ती-क्षमतांचा वापर अशा तऱ्हेने जाणता सवरता करीत असतात की त्यामुळे त्यांच्या स्वतःच्याच काही इतर शक्ती-क्षमतावर अनिष्ट व हानीकारक दुष्परिणाम होतात किंवा दुसऱ्या माणसांवर त्याचे दुष्परिणाम होतात. त्यांच्या हितासाठी बहाल करण्यात आलेली साधने त्यांच्या हातून वाया जातात. ही साधने त्यांना हितकर वापरासाठी दिली गेली असून ती निरर्थक वाया घालविण्यासाठी दिली गेलेली नव्हती. दुसऱ्या प्रकारची माणसे जाणूनबुजून व समजूनसवरुन तर अशी कृत्ये करीत नाहीत परंतु अज्ञानामुळे त्यांच्या हातून अशा चुका घडतात.

पहिल्या प्रकारची माणसे दुष्ट प्रवृत्तीची असतात. त्यांना काबूत ठेवता येईल अशी कायद्यांची व शिस्तीची आवश्यकता असते. दुसऱ्या प्रकारची माणसे अज्ञानी असल्याने त्यांना अशा शिक्षणाची गरज आहे ज्यामुळे त्यांना स्वतःच्या शक्ती क्षमतांचे ज्ञान होईल.

ईश्वराने जी शरिअत प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याकडे पाठविली आहे ती याच गरजेची पूर्तता करते. ती तुमच्यामधील कोणतीही शक्ती क्षमता नष्ट करू इच्छित नाही. कोणतीही इच्छा आकांक्षा व कोणतीही भावना नष्ट करू इच्छित नाही. जगाचा परित्याग करा, अरण्यात व गिरीकंदात जाऊन राहा. उपाशी राहा, नागडे हिंडा, आत्मक्लेश करून स्वतःला कष्टात पाडून घ्या आणि जगातील सुख व आराम यांना स्वतःसाठी निषिद्ध माना; असे ती मुळीच सांगत नाही. ही ईश्वरनिर्मित शरिअत आहे व तोच ईश्वर आहे ज्याने या सृष्टीची निर्मिती माणसासाठी केली आहे. ही चराचर सृष्टी नष्ट करून टाकणे अगर विद्रूप करणे हे त्या ईश्वराला कसे पसंत पडेल? माणसामध्ये कोणतीही शक्ती अकारण व अनावश्यक ठेवलेली नाही. तसेच भूमीवर व अवकाशातही अशी कोणतीही वस्तू निर्माण केलेली नाही जिचा कसलाही वापर केला जाऊ नये. या सृष्टीचा व्यापार चैतन्यमय रितीने चालावा. माणसांनी आपल्या प्रत्येक शक्ती क्षमतेचा पुरेपूर उपयोग करावा. जगातील प्रत्येक वस्तूपासून लाभ घ्यावा. तसेच ‘भूमंडलावर’ व अवकाशात पसरलेल्या सर्व साधनांचा वापर व उपयोग करावा परंतु वर सांगितलेल्या अज्ञानामुळे व दुष्टपणामुळे स्वतःचीही हानी करून घेऊ नये आणि इतर माणसांच्या हानीलाही कारणीभूत होऊ नये; अशीच ईश्वराची इच्छा आहे. ईश्वराने शरिअतचे सर्व नियम व तत्त्वे याच गरजेसाठी निर्माण केले आहेत. जितक्या वस्तू व बाबी माणसाला हानीकारक आहेत, त्या सर्व शरिअतमध्ये ‘‘हराम’’ (निषिद्ध) ठरविल्या गेल्या आहेत. तसेच ज्या गोष्टी हितकारक व लाभदायक आहेत त्यांना हलाल (वैध) ठरविण्यात आले आहे. जी कृत्ये करून मनुष्य स्वतःची अगर इतरांची हानी करतो त्या सर्व कृत्यास शरिअतने मनाई केली आहे. माणसांना हितकारक व कोणासही हानीकारक नसणाऱ्या अशा सर्व कृत्यांना शरियत अनुमती देते. जगामध्ये माणसाला सर्व इच्छा, आकांक्षा व गरजांची पूर्तता करण्याचा व स्वहितासाठी हरप्रकारचा प्रयत्न करण्याचा हक्क आहे. या हक्कांचा वापर त्याने अशा तऱ्हेने करावयास हवा की अज्ञानापोटी व दुष्टपणाने त्याने इतरांचे हक्क हिरावू नये. उलट शक्य तितके इतरांना सहाय्यक व मदतगार व्हावे; या तत्त्वावर शरिअतचे सर्व कायदे व नियम आधारलेले आहेत. ज्या कृत्यात एक बाजू हितकारक व दुसरी बाजू हानीची असेल तर अशा बाबतीत मोठ्या हितापोटी लहानशी हानी पत्करली जावी व मोठी हानी टाळण्यासाठी लहानसे हित त्यागिले जावे अशी शरिअतची तत्त्वे व धारणा आहे.

वास्तविकपणे प्रत्येक काळात, प्रत्येक वस्तूचा व प्रत्येक कार्याचा फायदा व तोटा प्रत्येक माणसाला ठाऊक नसतो. म्हणूनच ज्यापासून विश्वसृष्टीतील कोणतेही रहस्य दडलेले नाही अशा ईश्वराने माणसाच्या संपूर्ण जीवनातील एक अचूक नियमावली बनविली आहे. या नियमावलीची कित्येक गुणवैशिष्ठ्ये आजपासून मागील कित्येक शतकापर्यंत माणसांना आकलन होत नव्हती. परंतु शिक्षण व ज्ञानाच्या प्रगतीमुळे त्यांचे आकलन सुकर झाले आहे. अजूनही बऱ्याच काही हितकारक बाबी लोकांच्या लक्षात येत नाहीत, परंतु शिक्षण व ज्ञान यांची जसजशी प्रगती होत राहील तसतसे त्या बाबी लोकांना उमगतील. आपल्या तोकड्या शिक्षणावर व त्रुटीयुक्त ज्ञानावर जी माणसे विसंबून राहतात ती शतकानुशतके चुका करीत व ठेचा खात राहतात. सरतेशेवटी याच शरिअतच्या कोणत्या ना कोणत्या कायद्याचा अवलंब करण्यास ही माणसे विवश झालेली आहेत. परंतु जे लोक ईश्वराचे प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यावर दृढ विश्वास ठेवून व विसंबून राहिले ते अज्ञान व अडाणीपणापासून उद्भवणाऱ्या हानीपासून सुरक्षित आहेत. त्यांना शरिअतच्या हितकारक उद्दिष्टांचे ज्ञान असो वा नसो, कोणत्याही स्थितीत ते केवळ अल्लाहचे प्रेषित मुहम्मद (स.) वरील विश्वासावर विसंबून असल्याने अशा प्रकारच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करतात की जे अचूक व निखालस ज्ञानानुसार बनविले गेले आहेत.

ईश्वरासंबंधीचे माणसाचे सर्वप्रथम कर्तव्य असे आहे की माणसाने केवळ त्यालाच ईश्वर मानावे व त्या ईशत्वात अन्य कोणासही सहभागी करू नये. आम्ही मागे सांगितल्याप्रमाणे ‘ला इलाहा इल्लल्लाह’ म्हणजे ‘अल्लाहखेरीज अन्य कोणीही ईश्वर नाही’, या ईशवचनावर ईमान धारण केल्याने या कर्तव्याची पूर्तता होते.
ईश्वरासंबंधीचे माणसाचे दुसरे कर्तव्य असे आहे की, ईश्वराकडून जे आदेश येतील त्या सर्वांचा मनःपूर्वक स्वीकार केला जावा. हे कर्तव्य, अल्लाहचे प्रेषित (स.) वर ईमानधारण केल्याने पूरे होते. हे हक्क ‘‘मुहम्मदुर्रसूल्लल्लाह’’ (मुहम्मद ईश्वराचे प्रेषित आहे) यावर ईमान धारण केल्याने अदा होते. याबाबतीत मागे आम्ही तपशीलाने विवरण केलेलेच आहे.
ईश्वरासंबंधीचे तिसरे कर्तव्य असे की त्याच्या आज्ञांचे पालन केले जावे. ईशग्रंथ पवित्र ‘कुरआन’ व प्रेषित मुहम्मद (स.) यांचा उक्ती व आचरण (सुन्नत) संग्रह व नियमांचे पालन केल्याने, हे कर्तव्य पार पडते. याकडेही आम्ही मागे निर्देश केलेला आहे.
ईश्वरासंबंधी चौथे कर्तव्य हे की, त्याची उपासना केली जावी. मागील प्रकरणात निर्देश केल्याप्रमाणे या कर्तव्याची पूर्तता होण्यासाठी काही अनिवार्य कर्तव्ये आहेत. हे कर्तव्य इतर कर्तव्यात अग्रगण्य आहेत. म्हणून ते पार पाडण्यासाठी बाकी कर्तव्यात काही प्रमाणात त्याग करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, नमाज, रोजे, इत्यादी अनिवार्य कर्तव्ये पार पाडताना मनुष्य आपल्या स्वतःच्या देहासंबंधीच्या व आत्म्यासंबंधीच्या बऱ्याचशा कर्तव्यांचा परित्याग करीत असतो. नमाजसाठी मनुष्य भल्या पहाटे उठून गार पाण्याने हात, पाय, तोंड, स्वच्छ करतो (वझू), पूर्ण दिवसात व रात्री आपली निकडीची कामे अनेकदा बाजूला सारतो. रमजान महिन्यात संपूर्ण महिनाभर भूक, तहान व इच्छावासनांना काबूत राखण्याचे क्लेश सहन करतो.
जकातच्या कर्तव्याची पूर्तता करताना आपल्या धनाशक्तीचे ईश्वरावरील आसक्तीत रुपांतर करतो. हज करताना प्रवासाचा त्रास व पैशाच्या खर्चाचा त्रास सहन करतो. जिहादमध्ये स्वतःचे प्राण व धनसंपत्तीचे बलिदान करतो. याच तऱ्हेने इतरांची कर्तव्येही थोड्याफार प्रमाणात त्यागतो. उदा. नमाजासाठी, एक कर्मचारी आपल्या मालकाचे काम बाजूला ठेऊन आपल्या मोठ्या स्वामीच्या उपासनेसाठी जातो. हज करताना एक मनुष्य आपले सर्व व्यवहार सोडून देऊन पवित्र मक्केचा प्रवास करतो व त्यामध्ये इतरांच्या अनेक कर्तव्यावर त्याचा परिणाम होतो. जिहादमध्ये मनुष्य केवळ ईश्वरासाठी प्राण घेतो व प्राण देतो. याच तऱ्हेने माणसाच्या अखत्यारीतील बऱ्याचशा लाभकारक वस्तुचेही ईशकर्तव्य पार पाडताना बलिदान केले जाते. उदा. प्राण्याचे बलिदान व धनाचा व्यय.
परंतु महान ईश्वराने स्वतःविषयीच्या माणसांच्या कर्तव्यासंबंधी काही सीमा घालून दिल्या आहेत. अल्लाहचे जे कर्तव्य पार पाडण्यासाठी इतर कर्तव्याचा जितका किमान त्याग अटळ आहे, त्यापेक्षा अधिक त्याग केला जाऊ नये. उदा. नमाज घ्या. ईश्वराने जी नमाज तुम्हासाठी अनिवार्य केली आहे, ती अदा करण्यासाठी तुम्हाला सर्व प्रकारच्या सवलती ठेवल्या गेल्या आहेत. ‘वजू’ करण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्यास अथवा प्रकृती अस्वस्थ असेल तर ‘तयम्मुम’ करा. प्रवासात असाल तर नमाज ‘कसर’ (संक्षिप्त) करा. आजारी असताना नमाज बसून अगर आडवे होऊनही अदा करा. तसेच प्रत्यक्ष नमाजमध्येही जी वचने उच्चारली व पठन केली जातात तीही इतकी काही जास्त प्रमाणात नसतात की त्यासाठी फार वेळ खर्च व्हावा. निवांत वेळ असल्यास, माणसाची इच्छा असेल तर त्याने सूरह ‘बकरा’ सारख्या दीर्घ वचनाचे पठन करावे, परंतु घाईगर्दीच्या वेळी प्रदीर्घ नमाज अदा करण्यापासून रोखण्यात आले आहे. या अनिवार्य नमाजखेरीज एखादी व्यक्ती आणखी काही अतिरिक्त नमाज (नफील) स्वेच्छेने अदा केल्यास त्यापासून ईश्वर प्रसन्न होतो. परंतु ईश्वराची अशी इच्छा नसते की तुम्ही रात्रीची झोप तसेच दिवसाची विश्रांती स्वतःसाठी निषिद्ध करून घ्यावी किंवा आपली उपजीविका अर्जित करण्याची वेळ नमाज अदा करण्यात घालवावी अथवा अल्लाहच्या दासांचे न्याय हक्क डावलून अपहरण करून नमाजच अदा करत राहावे.
याचप्रमाणे ‘रोजे’ करण्यातही सर्व प्रकारच्या सवलती दिल्या गेल्या आहेत. वर्षात केवळ एक महिनाभर ‘रोजे’ अनिवार्य केले आहेत, तेसुद्धा प्रवासात व आजारपणात तहकूब (कजा) केले जाऊ शकतात. ‘रोजे’ केलेली व्यक्ती आजारी झाल्यास व जीवाचा धोका असल्यास ती व्यक्ती ‘रोजा’ मोडू शकते. प्रत्यक्ष ‘रोजाचा’ जितका काळ निश्चित केला गेला आहे त्यात एका मिनिटाची ही वाढ करणे बरोबर नाही. ‘सहेरी’च्या शेवटच्या क्षणापर्यंत खाणेपिण्याची परवानगी आहे. इफ्तारची वेळ झाल्याबरोबर ‘रोजा’ सोडण्याचा हुकूम आहे. अनिवार्य ‘रोजा’व्यतिरिक्त जर एखाद्याने अधिक (नफ्ल) रोजे केले तर ती ईश्वराच्या अधिक प्रसन्नतेचे कारण ठरेल. परंतु तुम्ही सतत रोजे करत असावे व जीवनात कोणतेही काम करण्यास असमर्थ होण्याइतपत स्वतःला अशक्त करून घ्यावे. ही गोष्ट ईश्वराला पसंत नाही.
जकातचेही ईश्वराने कमीतकमी प्रमाण ठरविलेले आहे आणि जकात अशा माणसावरच लागू आहे ज्यांच्यापाशी इस्लामने निश्चित केलेली इतकी संपत्ती आहे. याहून जास्त जर कोणाच्या स्वखुषीने ईश्वरी मार्गात खर्च केली, तर ईश्वर त्यावर प्रसन्न होईल. परंतु तुम्ही स्वतःचे व तुमच्या संबंधितांचे हक्कांना बळी देऊन, आपले सर्वस्व दान (सदका) मध्ये देऊन टाकून स्वतः दरिद्री होऊन असहाय्य होऊन राहावे. हे ईश्वराला पसंत नाही. यातही समतोल राखण्याचा आदेश आहे.
आता हजकडे पाहा! प्रथमतः प्रवासखर्चाची कुवत बाळगतात व प्रवासाची दगदग सहन करण्याची क्षमता बाळगतात, केवळ अशा लोकांसाठीच ते अनिवार्य केले गेले आहे. त्यात आणखी एक सवलत अशी ठेवली गेली आहे की आयुष्यभरात एकदा व सोईस्कर असेल तेव्हा जाऊन येऊ शकता. मार्गात युद्ध चालू असेल अगर अशांत परिस्थिती असून त्यामुळे जीवास धोका होण्याचा संभव असेल तेव्हा हजयात्रेची मनिषा तहकूब करू शकता. त्याचबरोबर माता, पित्याची अनुमतीही आवश्यक असल्याचे ठरविले गेले आहे जेणेकरून वृद्ध माता-पित्यांना तुमच्या गैरहजेरीत काही कष्ट पडू नयेत. या सर्व गोष्टीवरून सर्वश्रेष्ठ अल्लाहने आपल्या हक्कपूर्तीमध्ये इतरांच्या हक्कांची किती प्रमाणात दक्षता घेतली आहे हे कळून चुकते.
अल्लाहच्या हक्काची पूर्तता करताना मानवी हक्कांचे सर्वांत मोठे बलिदान ‘जिहाद’ करताना होते. कारण त्यात मनुष्य आपले सर्वस्व, म्हणजे प्राण व संपत्तीसुद्धा ईश्वर मार्गात अर्पण करतो. इतरांचेही प्राण, संपत्ती बळी देतो. परंतु आम्ही या अगोदर म्हटल्याप्रमाणे इस्लामचे तत्त्व असे आहे की, मोठ्या नुकसानीपासून वाचण्यासाठी छोटे नुकसान सहन केले पाहिजे. हे तत्त्व डोळ्यांसमोर ठेवा व मग पाहा. काही शेकडे, काही हजार, काही लाख माणसांची हत्या होण्याच्या कित्येक पट मोठे नुकसान असे आहे की, सत्याच्या विरोधात असत्याची वृद्धी व्हावी. अल्लाहचा ‘दीन’ (ईशधर्म) सत्याचा इन्कार करणाऱ्यांसमोर, अनेकेश्वरवादासमोर, असत्यासमोर व अनिश्वरवाद्यासमोर दबून व नमून राहावा. पृथ्वीवर मार्गभ्रष्टता व अनाचार यांचा प्रसार व्हावा, वगैरे.
याचकरिता अशा विशाल नुकसानीपासून वाचण्यासाठी सर्वश्रेष्ठ अल्लाहने मुस्लिमांना असा हुकूम दिला आहे की, प्राणाच्या व धनसंपत्तीच्या तुलनात्मक छोटे नुकसान ईश्वराच्या प्रसन्नतेसाठी सहन केले जावे. परंतु त्याचबरोबर हेही सांगून ठेवले आहे की, जितके किमान रक्त सांडणे आवश्यक आहे त्यापेक्षा जास्त रक्त सांडू नका. वृद्ध, स्त्रिया, मुले, आजारी व जखमी माणसांवर हत्यारे उचलू नका. केवळ अशाच लोकांशी लढा जे असत्याच्या समर्थनार्थ तलवार हातात घेतात. शत्रूप्रदेशात अनावश्यक विध्वंस व बरबादी करू नका. शत्रूवर विजय मिळविला तर त्याच्याशी न्यायाने वागा. एखाद्या गोष्टीवर शत्रूशी करार झाला तर त्याचे पालन करा. सत्याशी वैर करण्याचे शत्रूंनी सोडून दिले तर लगेच युद्ध थांबवा. अल्लाहच्या हक्काच्या पूर्ततेच्या मार्गात मानवी हक्काच्या बलिदानाची जेवढ्या प्रमाणात आवश्यकता असते त्यापेक्षा जास्त प्रमाणात बलिदान करणे धर्मपसंत नाही.

जगात सध्या तीन प्रमुख धार्मिक संकल्पना प्रचलित आहेत,
१) एका संकल्पनेनुसार हे जग बंदी शाळा आहे. मनुष्याचे शरीर पिजंरा आहे. त्याच्या इच्छा-आकांक्षा म्हणजेच त्या पिजऱ्याचे गज आहेत. एखाद्या व्यक्तीला या तुरुंगातून मुक्ती तुरूंगाच्या भिती तोडल्यानंतरच मिळते. याचप्रमाणे व्यक्तीचा आत्मा मुक्त अथवा स्वतंत्र त्याच वेळी होईल जेव्हा ती व्यक्ती आपल्या हाताने शरीररूपी तुरूंगाचे गज तोडेल. याचाच दुसरा अर्थ असा आहे की त्या व्यक्तीने या जगाचा सन्यास घ्यावा आणि देवाशी तादाम्य पावण्यासाठी एकांतवास पत्कारावा. त्यांने स्वतःच्या इच्छा-आकांक्षांना मारून टाकावे आणि अशा प्रकारे ईश्वर आणि स्वतःच्या दरम्यानचा पडदा फाडून ईशसान्निध्य प्राप्त करून घ्यावे. या परिस्थितीत व्यक्तीला विद्यमान जगाचा त्याग करावाच लागतो.
धर्माची ही संकल्पना आणि उपासनापध्दत म्हणजेच संन्यासी जीवनपध्दत, तपस्वी अथवा सर्वसंग परित्यागी जीवनपध्दती होय. याचे दुसरे नाव ‘योग’ आहे (योगिक जीवनपध्दत).
२) दुसऱ्या धार्मिक संकल्पनेत इंद्रियदमन अथवा सर्वसंग परित्याग नाही. या पध्दतीत ईश्वराची उपासना असते आणि मानवी इच्छा-आकांक्षाचे मर्यादित स्वरूपात पालन होते आणि क्षणिक सुखांचा उपभोग घेता येतो. व्यक्तिगतरित्या धर्माचरण करण्यासाठी विशिष्ट आदेश पाळले जातात. व्यक्तिगत जीवनापलीकडे तो सार्वजनिक जीवनात स्वतंत्र असतो. या संकल्पनेनुसार धर्म आणि उपासनापध्दत ही व्यक्तिगत बाब आहे आणि समाजाशी त्यांचा अजिबात संबंध नाही. धर्म फक्त व्यक्ती आणि ईश्वर यांच्यातील संबंध आहे. मनुष्याच्या सामाजिक जीवनात धर्माची ढवळाढवळ होऊच शकत नाही. मनुष्याच्या क्षणिक जीवनात तो जे इच्छिल ते करू शकतो. जी पध्दत त्याला आवडते तिचा स्वीकार तो करील. धर्म आणि ईश्वर त्यामध्ये हस्तक्षेप करणार नाहीत.
३) तिसऱ्या संकल्पनेत इंद्रियदमन आणि सर्वसंग परित्याग यांना चुकीचे ठरविले आहे. यात उपासना ही व्यक्तिगत बाब आहे, या मताला खोडून काढले आहे. तसेच धर्म ही व्यक्तीगत बाब आहे यालासुध्दा चुकीचे ठरविण्यात आले आहे. या संकल्पनेनुसार सत्य हे वेगळे आहे. प्रार्थनेच्या स्थळी, बाजारात, कार्यालयात, शेतात, दुकानात, घरात, घराबाहेर कुठेही तसेच राजकारणात, अर्थकारण, समाजकारण सर्व ठिकाणी तो धार्मिक कृत्य पार पाडत असतो आणि ईश्वर उपासना करीत असतो. तो जीवनाच्या सर्व क्षेत्रांत धर्म व उपासनापध्दतीला टाळू शकत नाही. तसेच त्याच्या मनाप्रमाणे वागू शकत नाही. त्याला जी काही योग्यता आणि शक्ती दिली गेली आहे, ती उपासनेसाठीच दिली आहे. या योग्यता आणि शक्तींचे दमन या संकल्पनेत होत नाही. धर्मश्रध्दा आणि उपासना व्यक्तीला त्याच्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनात दिव्य प्रकटनांच्या आधारे मार्गदर्शन करतात. ती व्यक्ती जर अल्लाहची उपासना पवित्र स्थळी करीत आहे तर ती बाहेरच्या जगातसुध्दा उपासनापध्दतीला कार्यान्वित करणार. अल्लाहने जे आदेश दिले त्याला पाळणार आणि ज्यापासून रोखले त्यापासून ती व्यक्ती स्वतः ला रोखणारच. त्याचे या जगातील जीवन दिव्य प्रकटनाद्वारे नियंत्रित होते.
इस्लाम: परिपूर्ण जीवनव्यवस्था

जर आपण एकदा मान्य केले की आता रात्र आहे आणि दुसऱ्या क्षणी म्हटले की आता दिवस आहे तर असे म्हणणे निरर्थक आहे. इस्लाम वैराग्याला मान्यता देत नाही आणि तो फक्त वैयक्तिक जीवनाचे प्रश्न हाताळत नाही. असे म्हटल्यावर इस्लामची वैशिष्ट्ये आणि तत्त्वे आपोआप सिध्द होतात. म्हणजे असा कोणताही प्रश्न नाही जो इस्लामच्या कक्षेबाहेरचा असावा. हा तो धर्म आहे जो मनुष्याच्या पूर्ण आयुष्याला व्यापून आहे. इस्लाम ही ती नियमावली आहे, ज्यातून मानवी जीवनाचा कोणताच भाग सुटत नाही. धार्मिक, बौध्दिक, नैतिक, व्यावहारिक असा कोणताही प्रश्न इस्लामच्या कक्षेबाहेरचा नाही. हवा जशी सर्व पृथ्वीला व्यापून आहे त्याचप्रमाणे इस्लाम संपूर्ण मानवी जीवन व्यापून आहे. आपण त्याचे महत्त्वाचे घटक पाहू या.
१) इस्लाम धर्माचा प्रत्येक प्रभाग त्या व्यवस्थेच्या केंद्रस्थानी जोडलेला असतो. सर्व एकरुप असतात. हे केंद्रस्थळ म्हणजे ‘श्रध्देची कलमे’ होत, ज्यांचा आपण प्रकरण दोन मध्ये विचार केला आहे. त्यात म्हटले आहे की उपासना फक्त अल्लाहचीच केली जावी. अल्लाहच खरा मालक, खरा शासक, खरा पालक आहे. अल्लाह सार्वभौम आहे. हे इस्लामचे मौलिक तत्त्व आहे, जो इस्लामी व्यवस्थेचा मूलाधार आहे. या व्यवस्थेच्या विभागास समजण्यासाठी त्याची तपशीलवार माहिती घेणे आवश्यक आहे.
२) या व्यवस्थेला आपल्यावर लागू करणे हे मुस्लिम (आज्ञाधारक) समाजासाठी अनुषंगिक आहे. ज्या समाजमनात अल्लाहवर प्रगाढ विश्वास आहे आणि त्याच्या विशेष गुणांवर भरोसा आहे; तसेच तो समाज गांभीर्यपूर्वक प्रेषित्व आणि परलोकत्व यावर विश्वास ठेवून आहे; असा समाज इस्लामचा आज्ञाधारक आणि अनुयायी समाज आहे. या व्यवस्थेचे व्यवस्थित परीक्षण करण्यासाठी त्याचा अभ्यास इस्लामी समाज व्यवस्थेबरोबर होणे आवश्यक आहे. जसे तलवारीच्या धारेची पारख एक हुशार तरबेज तलवारबाजच करू शकेल त्याचप्रमाणे इस्लामी व्यवस्थेचे खरे परीक्षण इस्लामी समाज पूर्णतः अस्तित्वात आल्यानेच होणार आहे. या इस्लामी व्यवस्थेचे वेगवेगळे भाग एकमेकात गुंतलेले आहेत जसे मशीनचे वेगवेगळे भाग दिसायला वेगवेगळे दिसतात परंतु त्यांचे कार्य एक आहे.

मनुष्य आपल्या स्वतःवरच सर्वांत जास्त अत्याचार करीत असतो, हे ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल. खरेतर ही बाब विस्मयकारकच आहे, कारण सकृतदर्शनी तर प्रत्येक माणसाची अशीच भावना असते की सर्वांत अधिक प्रेम त्याचे स्वतःवरच आहे. कोणताही व्यक्ती स्वतःचाच वैरी असल्याचे मान्यही करणार नाही, परंतु यावर थोडेसे विचार-चिंतन केल्यास यातील वास्तवता तुमच्या दृष्टीस पडेल.

माणसाची एक मोठी कमजोरी अशी आहे की त्याची एखादी इच्छा अधिक प्रबळ बनली की तो तिचा दास बनतो. तिच्या पूर्ततेसाठी तो समजून सवरून अगर अजाणतेपणी स्वतःचे बरेच नुकसान करून घेतो. तुम्ही पाहता की एखाद्या माणसाला एखाद्या व्यसनाची लत लागते. तो त्या व्यसनासाठी वेडा बनतो व स्वतःच्या प्रकृतीचे नुकसान, आर्थिक नुकसान, प्रतिष्ठेचे नुकसान किंबहुना सर्व प्रकारचे नुकसान सहन करीत राहतो. दुसरा एखादा मनुष्य खाण्याच्या खाद्य व चवीचा इतका लोभी बनतो की कसलेही खाद्य स्वाहा करून टाकतो व आपल्या जीवाचा घात करून घेतो. तिसरा एखादा मनुष्य वैषयिक सुखाचा आसक्त बनतो व अशी कृत्ये करीत असतो की त्याचा अनिवार्य परिणाम त्याचा स्वतःचा नाशच असतो. चौथा एखादा मनुष्य आध्यात्मिक उन्नतीच्या तोऱ्यात असतो. तो आपल्या स्वतःच्या प्राणावरच उठतो आणि आपल्या आत्म्याच्या सर्वच इच्छावासना ठेचून टाकतो. आपल्या देहाच्या गरजांची पूर्तता करण्यासही इन्कार करतो, विवाहापासून दूर पळतो. खाणेपिणे वर्ज्य करतो, कपडे घालण्यात नकार देतो, किंबहुना श्वासोच्छवास करण्यासही तो राजी नसतो. गिरीकंदरात जाऊन बसतो आणि हे जग त्याच्यासाठी निर्माण केले नाही असे समजतो.

आम्ही केवळ उदाहरणासाठी माणसाच्या अतिरेकप्रियतेचे वर काही नमुने दिले आहेत. वास्तविकपणे अशा प्रकारची अगणित रुपे आपल्या सभोवताली रात्रंदिवस आढळून येतात.

इस्लामची ‘शरिअत’ मानवाचे कल्याण व सफलतेसाठी आहे. म्हणून ती माणसाला सावधान करते की, ‘‘तुझ्यावर तुझ्या स्वतःचेही काही हक्क आहेत.’’

शरिअत माणसाला अशा सर्व गोष्टींपासून रोखते व परावृत्त करते, ज्यापासून मानवाला हानी व नुकसान होते. उदा. दारू, ताडी, अफू, गांजा व अन्य मादक पदार्थ, डुकराचे मांस, हिंस्त्र प्राण्याचे मांस व विषारी जिवाणू, अमंगल प्राणी, रक्त तसेच मृत प्राण्यांचे मांस वगैरे; याचे कारण असे की या वस्तूंचा अनिष्ट परिणाम माणसाच्या आरोग्यावर, चारित्र्यावर, बौद्धिक व आत्मिक बळावर होतो. याउलट शरिअत स्वच्छ, निर्मळ व लाभकारक वस्तू माणसासाठी ‘हलाल’ ठरविते व ती माणसाला सांगते की निर्मळ व हितकारक अशा हलाल वस्तू तू स्वतःसाठी त्याज्य मानू नकोस. कारण की तुझ्या देहाचाही तुझ्यावर काही हक्क आहे.

शरिअत माणसाला नागडे होण्यापासून रोखते व त्याला आदेश देते की ईश्वराने तुझ्या देहासाठी जो वस्त्रांचा साज निर्माण केला आहे त्याचा लाभ घे आणि आपल्या देहाचे असे सर्व भाग झाकून घे, ज्या भागाचे प्रदर्शन असभ्यता व निर्लज्जपणा ठरते.

शरिअत माणसाला उपजीविकेसाठी झटण्याचा आदेश देते व निरूद्योगी न राहण्याचा आदेश देते. भिक्षा मागू नकोस, उपाशी मरू नकोस, ईश्वराने तुला ज्या शक्ती दिल्या आहेत त्याचा वापर कर असे सांगते. पृथ्वीवर व आकाशात तुझ्या सुखासाठी व पोषणासाठी ज्या वस्तू निर्माण केल्या आहेत त्यांना उचित मार्गाने प्राप्त कर.

शरिअत माणसाला विषयसुखाची वासना दाबून ठेवण्यापासून रोखते व माणसाला आदेश देते की आपल्या वैषयिक इच्छेच्या पूर्ततेसाठी ‘निकाह’ (विवाह) कर.

ती माणसाला आत्मक्लेश करण्यापासून परावृत्त करते आणि असे म्हणते की आराम व सुखकारक गोष्टी व जीवनाचा आनंद स्वतःसाठी त्याज्य करून घेऊ नकोस. जर तुला आत्मिक उन्नती, ईश्वराचे सान्निध्य व पारलौकिक जीवनातील सफलता हवी असेल तर त्यासाठी जगाचा त्याग करण्याची गरज नाही. याच जगात जीवन जगताना पूर्णतः इहलोकातील सर्व व्यवहार मन लावून करतानाच ईश्वराचे स्मरण करणे, त्याच्या अवज्ञेपासून दूर राहणे व त्याने निर्मिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे, हेच या जगातील तसेच पारलौकिक जीवनातील सर्व साफल्याचे साधन आहे.

शरिअत माणसाला आत्महत्येपासून परावृत्त करते व म्हणते की, ‘‘तुझे प्राण ही वास्तविकपणे ईश्वराची मालमत्ता आहे. ती तुला एवढ्यासाठीच दिली गेली आहे की त्याचा वापर तू ईश्वराने निश्चित केलेल्या कालावधीपर्यंत करावा, ती प्राणरूपी मालमत्ता तू वाया दवडावी यासाठी दिली गेलेली नाही.’’
प्राणिमात्राचे व वस्तुमात्राचे हक्क
आता चौथ्या प्रकारच्या हक्कांचे थोडक्यात विवरण पाहू या. ईश्वराने मानवजातीला अन्य अगणित चराचरावर म्हणजे प्राणिमात्रावर तसेच वस्तुमात्रावर अधिकार बहाल केले आहेत. मनुष्य स्वतःच्या शक्तीने त्यांना आपल्या अधीन करतो. त्यांच्यापासून कामे करून घेतो व त्यांच्यापासून लाभ घेतो. बुद्धिनिष्ठ श्रेष्ठत्वाच्या कारणाने मानवप्राण्यास अशा प्रकारचा उपयोग करण्याचा पूर्ण हक्क आहे. त्याचबरोबर त्या अन्य प्राणिमात्रांचे व वस्तुमात्रांचेही काही हक्क मानवावर आहेत. ते हक्क असे की मानवाने त्याचा अकारण व्यय करू नये. कसल्याही आवश्यकतेखेरीज त्यांना इजा, त्रास अगर अपाय पोचवू नये. स्वतःच्या हितासाठी अनिवार्य अशी त्यांची किमान हानी करावी. तसेच त्यांचा वापर करण्यासाठी अधिकाधिक चांगल्या पद्धती निवडाव्यात.
यासंबंधी शरिअतमध्ये विपुल प्रमाणात आदेश वर्णिलेले आहेत. उदा. पशूंची हत्या केवळ त्यांचा उपद्रव व त्यामुळे होणारी हानी टाळण्यासाठी तसेच अन्नासाठीच करण्याची अनुमती दिली गेली आहे परंतु केवळ क्रीडा अगर मनोरंजनासाठी त्यांची हत्या करण्यास अवरोध केला गेला आहे.
ज्यांचे मांस अन्न म्हणून उपयोगात येते, अशा प्राण्याची हत्या, त्यांचा गळा सुरीने कापण्याची (जिबाह) पद्धत निश्चित केली गेली आहे. प्राण्यांचे उपयुक्त मांस प्राप्त करण्याची ही सर्वोत्तम पद्धत आहे. याखेरीज ज्या पद्धती आहेत त्या जरा कमी क्लेशदायक असल्या तरी मांसाचे कित्येक उपयुक्त गुण त्यामुळे नष्ट होतात. याउलट मांसातील उपयुक्त गुण टिकविणारी दुसरी पद्धत असेल तर ती जिबाहच्या पद्धतीहून जास्त क्लेशदायक आहे. इस्लाम ही दोन्ही टोके टाळतो. इस्लामनुसार प्राण्यांचे हाल करून निर्दयपणे त्यांची हत्या करणे नापसंत आहे. विषारी जीवाणू व हिंस्त्र श्वापदाची हत्या करण्याची अनुमती केवळ एवढ्यासाठीच देतो की माणसाचा प्राण त्यांच्यापेक्षा अधिक मौलिक आहे. परंतु अशा प्राण्यांनाही हालहाल करून ठार करणे यासाठी संमती नाही. ओझे वाहणारे व प्रवासास उपयुक्त प्राण्यांना भुकेले ठेवण्याची व त्यांच्यापासून अवजड कष्टाची कामे करून घेण्याची तसेच त्यांना निर्दयपणे मारझोड करण्याची सक्त मनाई आहे. पक्ष्यांना अकारण बंदिस्त करून ठेवणेही अप्रिय ठरविले गेले आहे. प्राण्याचेच नव्हे तर वृक्ष, वनस्पतींना अकारण इजा व हानी करण्याची अनुमतीही इस्लाम देत नाही. तुम्हाला त्यांची फळे, फुले तोडून घेता येईल. परंतु वृक्षांचा अकारण नाश करण्याचा तुम्हास कसलाही अधिकार नाही. वृक्ष-वनस्पती तर सजीव आहेत. इस्लाम कोणत्याही निर्जीव वस्तूचाही निरर्थक व्यय धर्मसंमत मानत नाही. तसेच पाण्याची नासाडी करण्यास रोखतो.

ख्रिश्चन लोक मुस्लिमांच्या धर्मांच्या बाबतीतील कट्टरपणाला भ्याले असणे शक्य आहे. हे जर खरे असेल, तर धार्मिक कट्टरपणाचा खरा अर्थ त्यांना समजला नाही, असे वाटते. जर त्यांना त्याचा खरा अर्थ जाणून घ्यायचा असेल तर तो खालील उदाहरणात सापडेल.
धार्मिक न्यायालये
चर्चने जी धार्मिक न्यायालये स्थापन केली होती त्यांचा खरा हेतू स्पेनमधून मुस्लिमांचे उच्चाटन करण्याचा होता. या न्यायालयांनी मुस्लिमांना भयानक शिक्षा ठोठावल्या व त्यांना छळण्यासाठी असा घृणास्पद पद्धतीचा अवलंब केला जे त्यापूर्वी कधीही आढळून आले नव्हते. त्यांनी मुस्लिमांना जिवंत जाळले, त्यांची नखे उपसून काढली, डोळे बाहेर काढले गेले व त्यांच्या शरीराचे अवयव कापले गेले. या सर्व कृतांचा उद्देश मुस्लिमांना त्यांच्या धर्मापासून परावृत्त करुन, ख्रिश्चन धर्मश्रद्धेचे पालन करणारे बनविण्याचा होता.
पूर्वेत इस्लामी देशात वास्तव्य करणाऱ्या ख्रिश्चनांनाही अशा प्रकारच्या वागणुकीला कधीतरी तोंड द्यावे लागले आहे काय?
मुस्लिमांची सर्रास कत्तल
पक्षपातीपणाची पूजा करणारे हे लोक युगोस्लाविया, अल्बानिया, रशिया व युरोपच्या अंमलाखाली असलेल्या उत्तर आफ्रिका, सोमालीलँड, केनिया, झांझीबार व मलायामध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या नावाखाली व कधीकधी राष्ट्र शुद्धीकरणाच्या नावाखाली, मुस्लिमांची सर्रास कत्तल करीत आहेत.
इयियोपिया धार्मिक कट्टरपणा व संकुचित दृष्टिकोनाचे एक उदाहरण
प्राचीन काळापासून इजिप्तबरोबर ऐतिहासिक, भौगोलिक, संस्कृतिक व धार्मिक नात्याने निगडित असलेला इथियोपिया देश हा धार्मिक संकुचितपनाचे आणखी एक उदाहरण आहे. त्यात मुस्लिमांची तसेच ख्रिश्चनांची लोकसंख्या एकत्र मिसळलेली आहे. मुस्लिमांच्या लोकसंख्येचे प्रमाण ३५ ते ६५ टक्कें असूनही, संपूर्ण देशात मुस्लिमांच्या मुलांना इस्लामी शिक्षण अगर अरबी भाषा शिकवण्याची कसलीही तरतूद अस्तित्वात नाही. मुस्लिमांनी स्वप्रयत्यांनी ज्या काही थोड्याशा खाजगी शाळा (धार्मिक शिक्षण देणाऱ्या) उघडल्या आहेत, त्यांच्यावर मोठमोठे कर लादण्यात येत आहेत. त्यांच्या मार्गात अनेक अडचणी निर्मांण करण्यात येत आहेत व त्याच्या परिणामस्वरुप त्यांना अपयश येते व नंतर कोणालाही नवीन शाळा उघडण्याचे साहस होत नाही. इस्लामी शिक्षणाची प्रगती होणे अशक्य व्हावे असे प्रयत्न करण्यात येतात व शिकविणारेही ठराविक रुळलेल्या पद्धतीच्या चाकोरीबाहेर येऊ नयेत यावर कटाक्ष ठेवण्यात येतो.
मुस्लिमांची दयनीय अवस्था
इटलीच्या हल्ल्यापूर्वी इतियोपियामध्ये अशी अवस्था होती की एखाद्या मुस्लिम ऋणकोने आपल्या ख्रिश्चन धनकोचे कर्ज जर मुदतीत परत केले नाही, तर सावकार त्याला आपला गुलाम बनवून घेत असे. अशा तऱ्हेने सरकारच्या डोळ्यादेखत मुस्लिमांना गुलाम बनवून त्यांची विक्री केली जात असे. त्यांना तऱ्हेतऱ्हेच्या यातनात झोकून दिले जात असे. मुस्लिम निग्रो एकूण लोकसंख्येच्या एकतृतीयांश असूनसुद्धा त्यांचे प्रतिनिधित्व करण्यास मंत्रीमंडळात कोणीही मुस्लिम मंत्री नाही किवा इतर कोणत्याही महत्त्वाच्या अधिकारपदावर नाही.
इस्लामी देशांत वास्तव्य करणाऱ्या ख्रिश्चनांना कधीतरी अशा वागणुकीचा अनुभव अगर संबंध आला आहे काय? व त्यांचे धर्मबंधू आजसुद्धा मुस्लिमांशी ज्या प्रकारचे वर्तन करीत आहेत, तसाच व्यवहार जर त्यांच्याशी केला गेला तर त्यांना ते आवडेल काय? काहीही झाले तरी धार्मिक कट्टरपणाचा खरा अर्थ असा आहे.
अल्पसंख्याक व आर्थिक स्वातंत्र्य
कम्युनिस्टांसमीप मानवी जीवन खऱ्या अर्थाने आर्थिक स्वातंत्र्याचेच दुसरे नाव आहे. थोड्या वेळापुरती ही कल्पना खरी मानली तरी इस्लामी देशांत वास्तव्य करणारे ख्रिश्चन लोक जीवनांतील या महत्त्वाच्या मूल्यापासून कधी वंचित राहिले आहेत काय? इस्लामी राज्याने त्यांना संपत्ती करण्यास, खरेदी करण्यास व धनसंपत्तीचा संचय करण्यास कधी मनाई केली आहे? किवा केवळ परधर्माचे म्हणून शिक्षणापासून, हुद्यापासून अगर सरकारी हुद्यापासून कधी वंचित ठेवले आहे?
इंग्रजांचा खोडसाळपणा
नैतिक व आध्यात्मिक जीवनाच्या संदर्भांत, इस्लामी देशातील रहिवाशी ख्रिश्चनांना, त्यांची धर्मपरंपरा दडपली गेली अशा एकाही दडपणशाहीला तोंड द्यावे लागले नाही. वर्तमान काळात याची जी दोन उदाहरणे आढळतात. त्यांना जाणूनबुजून उद्युक्त करणारे ब्रिटिश साम्राज्य, त्याचे खरे कारण होय. तसे झाल्याने भिन्नभिन्न लोकसमूहांत विषाची बीजे पेरली जावीत व त्यांच्यात आपापसात वैमनस्य वाढावे.
जिझिया व त्याची हकीकत
काही मुस्लिम विरोधी लोक जिझियाचे उदाहरण देऊन मुस्लिमेत्तराकडून ते वसूल करण्याचे प्रमुख कारण धार्मिक असहिष्णुता होती असे म्हणतात. या आरोपाचे सर्वोत्कृष्ट उत्तर आर्नल्डने दिले आहे. त्याने आपले ‘प्रीचिग ऑफ इस्लाम’ या पुस्तकात लिहिले आहे की, ‘या उलट, मुस्लिम असलेल्या काही इजिप्शियन शेतकऱ्यांना जेव्हा सैनिकी सेवेतून वगळले जात होते, तेव्हा ख्रिश्चनावर लादला जात होता तसाच कर, मोबदल्याच्या स्वरुपांत त्यांच्यावरही लादला जात असे.’ (पान ६२)
पुढे जाऊन सर आर्नल्ड असे लिहितात,
मुस्लिम पुरुषांना जशी सक्तीची सैनिकी सेवा करावी लागते, तशा सेवेऐवजी वर वर्णन केल्याप्रमाणे सुदृढ प्रकृतीच्या पुरुषाकडून जिझिया कर वसूल केला जात होता. तसेच ख्रिश्चन लोक मुस्लिम सेनेत दाखल होऊन सैनिक सेवा करत, तेव्हा त्यांना या करापासून वगळल्याचे घोषित करण्यात येत असे. म्हणूनच अन्ताकियाच्या शेजारी वास्तव्य करणाऱ्या अल जुराजमाव्या ख्रिश्चन समूहाशी, मुस्लिमांनी अशा अटीवर तह केला होता की ते त्यांचे मित्र राहतील व युद्धांत त्यांच्या बाजूने सहभागी होतील. याच्या मोबदल्यात त्यांना जिझिया द्यावा लागणार नाही, उलट युद्धभूमीवरील लुटीच्या मालात त्यांनाही योग्य वाटा दिला जाईल.
जिझिया हे मुस्लिमांच्या अनुदारपणाचे फळ नसून जे लोक सैनिकी सेवा करीत नसत अशा सर्व पुरुषांकडून धर्माचा भेदभाव न करता वसूल केला जाणारा एक कर होता.
कुरआन मध्ये जिझियाचा आदेश
या बाबतीतील संबंधित आयतीवर दृष्टिक्षेप टाकल्यास तो निष्फळ होणार नाही. कुरआनमध्ये असे सांगितले आहे,
‘‘जे ग्रंथधारक अल्लाहवर व निवाड्याच्या दिवसांवर श्रद्धा बाळगत नाहीत व जे काही अल्लाहने व त्याच्या प्रेषित मुहम्मद (स) यांनी निषिद्ध ठरविले आहे त्यांना वर्ज्य करीत नाहीत व सत्य धर्माचा स्वीकार करीत नाहीत, त्यांच्याशी तोपर्यंत युद्ध करा, जोपर्यंत ते आपल्या हातांनी जिझिया देत नाहीत व लहान होऊन राहात नाहीत.’’ ((कुरआन ९:२९)
या आयतीत मुस्लिमांना केवळ अशाच मुस्लिमेत्तराशी युद्धास उभे राहाण्यास सांगण्यात आले आहे जे इस्लामविरुद्ध युद्धास उभे राहतात. त्याचा मुस्लिम देशांत वास्तव्य करणाऱ्या मुस्लिमेत्तराशी कसलाही संबंध नाही.
मुस्लिमांत व मुस्लिम देशातील मुस्लिमेत्तर रहिवाशांत जे काही मतभेद व तंग वातावरण सध्या आढळते, ते वसाहतवादी, साम्राज्यवाद्यांची व कम्युनिस्टांची निपज आहे, हे सत्यही आम्ही शेवटी सांगून टाकू इच्छितो.
मुस्लिम व ख्रिश्चन या दोहोंच्या कच्च्या दुव्याशी कम्युनिस्ट परिचित आहेत म्हणून ते मजुरांना भेटतात तेव्हा त्यांना सांगतात की ‘जर तुम्ही कम्युनिस्ट चळवळीला पाठिबा दिलात तर सर्व कारखाने आम्ही तुमच्या ताब्यात देऊ. किसानांना जमिनीच्या मालकीहक्काची सुखस्वप्ने दाखवितात. बेकार विद्यार्थ्यांना म्हणतात की ‘जर तुम्ही कम्युनिजमचा स्वीकार केलात तर तुमच्या योग्यते व पात्रतेनुसार तुमच्यासाठी नोकऱ्या उपलब्ध करुन देण्यात येतील. लैंगिक स्वैराचाराला बळी पडलेल्या नवयुवकांना असा स्वतंत्र समाज निर्माण करण्याचे वचन देऊन त्यांना सोकविण्याचा प्रयत्न करतात, की जेथे कायद्याच्या व रुढींच्या कसल्याही प्रतिबंधाविना, त्यांना त्यांच्या सर्व इच्छावासना विनासायास पुऱ्या करता येतील.
दुसरीकडे ख्रिश्चनांशी बोलताना असे म्हणतात की, ‘जर तुम्ही कम्युनिजमला पाठिबा दिलात, तर धर्माच्या नावावर माणसांत भेदभाव करणाऱ्या इस्लामला आम्ही नष्ट करुन टाकू पण,
‘‘त्यांच्या तोंडून निघणारी गोष्ट मोठी आहे, ते मात्र असत्य बडबडत असतात.’’ (कुरआन १८:५)
तात्पर्य असे की धर्माच्या आधारावर इस्लाम माणसमाणसांत भेदाभेद करतो असे म्हणणे म्हणजे केवळ एक खोटा आरोप आहे. कारण इस्लाम तर धर्म व श्रद्धा या बाबतीत कसलाही भेदभाव न करता सर्व मानवांना त्यांचे मूलभूत मानवी हक्क प्रदान करतो. तो माणसांना शुद्ध माणुसकीच्या आधारावर एकत्र करतो व त्यांना पसंत असलेल्या धर्माचा स्वीकार करण्याच्या व त्यानुसार आचारण करण्याच्या संपूर्ण स्वातंत्र्याची हमी देतो.
याच आधारावर मुस्लिमांप्रमाणेच, इस्लामी देशातील रहिवाशी ख्रिश्चन लोक आपल्या शेजाऱ्यांशी सुखाने जीवन व्यतित करण्याची इच्छा करतात व त्यांच्या बरोबरचे आपले ऐतिहासिक संबंध पूर्वीप्रमाणेच सुरळीत राखण्याची आकांक्षा धरतात. त्यांचे व मुस्लिमांचे, दोघांचेही हित सुरक्षित राहील अशी इच्छा करतात, अशी मला आशा वाटते. तसेच आमचे ख्रिश्चन बंधू या कम्युनिस्ट व साम्राज्यवादी दृष्टांच्या बोलण्यास फसणार नाहीत अशी आशा वाटते.

माननीय अब्दुल्लाह बिन अमर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘चार गुणवैशिष्ट्ये ज्या मनुष्यात असतील तो पक्का धर्मद्रोही असेल आणि ज्या मनुष्यात त्यापैकी कोणतेही एक गुणवैशिष्ट्य असेल तर त्याच्यात शत्रुत्वाचे एक गुणवैशिष्ट्य असेल, तर ते त्याने सोडून द्यावे. ती चार गुणवैशिष्ट्ये अशी आहेत- जेव्हा त्याच्याकडे एखादी ठेव ठेवण्यात आली तर त्यात अफरातफर करणे, खोटे बोलणे, वचन दिले तर ते न पाळणे आणि जेव्हा त्याचे कुणाशी भांडण झाले तर शिवीगाळ करणे. (हदीस : बुखारी, मुस्लिम)

माननीय इब्ने उमर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘सर्वांत मोठा खोटारडेपणा म्हणजे मनुष्याने आपल्या दोन्ही डोळ्यांना ती गोष्ट दाखवावी जी त्या दोन्ही डोळ्यांनी पाहिली नसेल.’’ (हदीस : बुखारी)
स्पष्टीकरण : म्हणजे त्याने कसलेही स्वप्न पाहिले नाही परंतु जागा झाल्यानंतर अतिशय मजेदार व चांगल्या गोष्टी सांगतो, म्हणतो की हे मी स्वप्नात पाहिले आहे, असे करणे म्हणजे आपल्या डोळ्यांद्वारे खोटे बोलविणे होय.
 माननीय असमा बिन्ते उमैस (रजि.) यांच्या कथनानुसार, आम्ही पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या एका पत्नीला घेऊन त्यांच्या घरी गेलो. जेव्हा आम्ही पैगंबरांच्या घरी पोहोचलो तेव्हा पैगंबरांनी दुधाचा एक ग्लास काढून आणला, मग त्यांनी आपल्या इच्छेनुसार प्यायले आणि त्यानंतर आपल्या पत्नीला दिला. त्या म्हणाल्या, ‘‘मला इच्छा नाही.’’ तेव्हा पैगंबर म्हणाले, ‘‘तुम्ही भूक व खोटारडेपणाला एकत्र करू नका.’’ पैगंबरांना जाणवले की आपल्या पत्नीला भूक लागलेली असूनदेखील त्या औपचारिकपणा दाखवित आहेत, म्हणून पैगंबरांनी खोट्या औपचारिकपणा दाखविण्यास मनाई केली आहे. (हदीस : मुअजम सगीर तिबरानी)
 माननीय सुफियान बिन असीद ह़जरमी (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तुम्ही आपल्या बंधुला एखादी गोष्ट सांगितली आणि त्याने तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवला, मात्र तुम्ही जी गोष्ट त्याला सांगितली ती खोटी होती, हा फार मोठा अप्रामाणिकपणा आहे.’’ (हदीस : अबू दाऊद)
 माननीय अब्दुल्लाह बिन आमिर (रजि.) यांच्या कथनानुसार, एके दिवशी पैगंबर मुहम्मद (स.) आमच्या घरी आले होते तेव्हा माझ्या आईने मला बोलविले, ‘‘इकडे ये! मी तुला एक वस्तू देईन.’’ तेव्हा पैगंबरांनी विचारले, ‘‘तुम्ही त्यांना काय देऊ इच्छिता?’’ आई म्हणाली, ‘‘त्याला खजूर देऊ इच्छिते.’’ पैगंबरांनी आईला म्हटले, ‘‘जर तुम्ही देण्यासाठी बोलविले आणि दिले नाही तर तुमच्या कर्मपत्रात हा खोटारडेपणा लिहिला जाईल.’’ (हदीस : अबू दाऊद)
स्पष्टीकरण : सर्वसामान्यपणे आई-वडील आपल्या मुलांशी असे वागतात की काही देण्याच्या बहाण्याने बोलवितात, मात्र देण्याची इच्छा नसते, तेव्हा हा अल्लाहपाशी खोटारडेपणा ठरेल. कर्मपत्रात हा खोटारडेपणाच्या यादीत लिहिला जाईल.
 माननीय अब्दुल्लाह बिन मसऊद (रजि.) सांगतात, खोटे बोलणे कोणत्याही स्थितीत वैध नाही, न गंभीरपणे आणि न गंमत म्हणून. आणि हेदेखील वैध नाही की तुमच्यापैकी कोणी आपल्या मुलाला एखादी वस्तू देण्याचे वचन द्यावे आणि ते पूर्ण न करावे. (हदीस : अल अदबुल मु़फरद, पृष्ठ ५८)
 माननीय बह़ज बिन हकीम (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘दुर्दशा व दुर्दैव आहे त्या मनुष्याकरिता जो लोकांना हसविण्यासाठी खोटे बोलतो, दुर्दशा आहे त्याच्याकरिता, दुर्दशा आहे त्याच्याकरिता.’’ (हदीस: तिर्मिजी)
स्पष्टीकरण : या हदीसमध्ये त्या लोकांना सावध करण्यात आले आहे जे बोलताना काही खोट्या गोष्टींचा समावेश करून तीखट-मीठ लावून मजेदार बनवितात आणि त्यापासून आनंद घेतात.
 माननीय अबू उमामा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘सत्यावर दृढ असणाNया मनुष्याने धर्माच्या बाबतीत वादविवाद न घातल्यास मी त्याच्यासाठी स्वर्गाच्या कोपNयांत एका घराची जबाबदारी घेतो, आणि जो खोटे बोलणार नाही, मग ते हसण्याच्या स्वरूपात का असेना; मी त्याच्यासाठी स्वर्गाच्या मधोमध एका घराची जबाबदारी घेतो आणि जो आपल्या नीतीमत्तेत सुधारणा घडवील, मी त्याच्यासाठी स्वर्गातील सर्वांत वरच्या भागातील घराची जबाबदारी घेतो.’’ (हदीस : अबू दाऊद)

माननीय अबू दरदा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘सर्वांत वजनदार वस्तू जी अंतिम निवाड्याच्या दिवशी मोमिनच्या तराजूमध्ये ठेवली जाईल ती म्हणजे त्याची नीतीमत्ता होय. अभद्र बोलणारा आणि अर्वाच्च कथन करणाराला अल्लाह अजिबात पसंत करीत नाही.’’ (हदीस : तिर्मिजी)

स्पष्टीकरण : ‘खलकुन हसनुन’चे स्पष्टीकरण देताना अब्दुल्लाह बिन मुबारक यांनी म्हटले आहे, ‘‘हुवा तला़कतुल व़िज्ह व ब़ज्लुल मअरु़फि व क़फ़्फल अ़जा.’’ (मनुष्याने एखाद्या हसतमुखाने भेटणे, अल्लाहच्या वंचित दासांवर धन खर्च करणे आणि कोणालाही त्रास न देणे यालाच चांगली नीतीमत्ता म्हणतात.)
    माननीय अली (रजि.) यांनी सांगितले,     ‘‘अश्लील बोलणारा आणि अश्लील गोष्टींचा प्रसार करणारा हे दोन्ही पाप सारखेच आहेत.’’ (हदीस : मिश्कात)
दुतोंडीपणा
    माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तुम्हाला अंतिम निवाड्याच्या दिवशी सर्वांत वाईट मनुष्य तो आढळेल जो जगात दोन चेहरे बाळगत होता. काही लोकांशी एका चेहऱ्याने भेटत होता आणि दुसऱ्या लोकांशी दुसऱ्या चेहऱ्याने.’’ (हदीस : मुत्त़फ़क अलैहि)
स्पष्टीकरण : दोन मनुष्यांमध्ये अथवा दोन समूहांमध्ये जेव्हा शत्रुत्व निर्माण होते तेव्हा प्रत्येक ठिकाणी काही लोक असेही आढळतात जे दोन्हींकडे पोहोचतात आणि दोघांच्या होकाराला हो म्हणतात आणि त्यांच्या आपसांतील शत्रुत्वावर चर्चा करतात व ते वाढविण्याचा प्रयत्न करतात, हा फार मोठा दुराचार आहे.
    त्याचप्रमाणे काही लोक समोर अतिशय दृढ संबंध प्रगट करतात मात्र जेव्हा तो निघून जातो तेव्हा त्याची निंदा करण्यास सुरूवात करतात, हाच दुतोंडीपणा आहे.
    माननीय अम्मार (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जगात दुतोंडीपणाने वागणाऱ्या मनुष्याच्या तोंडात अंतिम निवाड्याच्या दिवशी आगीच्या दोन जिव्हा असतील.’’ (हदीस : अबू दाऊद)
स्पष्टीकरण : अंतिम निवाड्याच्या दिवशी त्यांच्या तोंडात आगीच्या दोन जिव्हा यासाठी असतील की जगात त्याच्या तोंडातून आग निघत होती जी दोन मनुष्यांच्या आपसांतील संबंधाला जाळून टाकत होती.
चुगलखोरी
    माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘चुगलखोरी म्हणजे काय हे तुम्हाला माहीत आहे काय?’’ लोकांनी उत्तर दिले, ‘‘अल्लाह आणि त्याचे पैगंबर यांनाच त्याचे अधिक ज्ञान आहे.’’ पैगंबर म्हणाले, ‘‘चुगलखोरी म्हणजे तू आपल्या बंधुचा उल्लेख त्याला न आवडणाऱ्या पद्धतीने करावा.’’ मग पैगंबरांना विचारण्यात आले, ‘‘मी उल्लेख करीत असलेली गोष्ट जर माझ्या बंधुमध्ये आढळत असली तरीही ती चुगलखोरीच ठरेल काय?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘तुम्ही उच्चारलेली गोष्ट जर त्याच्यात आढळत असेल तरीही ती चुगलखोरीच झाली आणि जर ज्याच्यात ती गोष्ट नाही त्या मनुष्याबाबत जर ती गोष्ट म्हटली गेली तर तुम्ही त्याच्यावर आरोप करणे होईल.’’ (हदीस : मिश्कात)
स्पष्टीकरण : मोमिनला त्याच्या चुकीच्या वर्तनाबद्दल चांगल्या पद्धतीने टोकले गेले तर निश्चितच त्याला वाईट वाटणार नाही. त्याचप्रमाणे त्याच्या अपराधाची सूचना त्याच्या वरिष्ठांना दिली गेली तर तेही त्याला आवडेल, कारण हीदेखील त्याच्यात सुधारणा घडविण्याची एक पद्धत आहे. जर तुम्ही आपल्या मोमिन बंधुला समाजाच्या नजरेतून उतरविण्यासाठी त्याच्या अनुपस्थितीत त्याच्या त्रुटी सांगाल तर त्याला खूप वाईट वाटेल. जो मनुष्य उघडपणे अल्लाहची अवज्ञा करतो आणि कोणत्याही प्रकारे मान्य करीत नाही, त्याचे दुराचरण व्यक्त करणे चुगलखोरी नसून त्याचा स्वभाव समाजासमोर उघड करणे फार मोठे पुण्य आहे. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी याचेच मार्गदर्शन केले आहे.
    माननीय अबू सईद व जाबिर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘चुगलखोरी व्यभिचारापेक्षाही मोठे पाप आहे.’’ लोकांनी विचारले, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! चुगलखोरी व्यभिचारापेक्षा मोठे पाप कसे आहे?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘मनुष्य व्यभिचार करतो, मग पश्चात्ताप व्यक्त करतो तेव्हा अल्लाह त्याचा पश्चात्ताप कबूल करतो, परंतु जोपर्यंत तो मनुष्य ज्याची चुगलखोरी करण्यात आली आहे, त्या माणसाला क्षमा करीत नाही तोपर्यंत अल्लाह चुगलखोरी करणाऱ्याला क्षमा करणार नाही.’’ (हदीस : मिश्कात)
    माननीय अनस (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘चुगलखोरीचे एक प्रायश्चित्त हे आहे की ज्याची तू चुगलखोरी केली आहे त्या मनुष्याकरिता तू माफीची प्रार्थना करावी. अशाप्रकारे म्हणा– हे अल्लाह! तू माझी आणि त्याची मुक्ती कर.’’ (हदीस : मिश्कात)
स्पष्टीकरण : जर तो मनुष्य उपस्थित असेल आणि त्याच्याकरवी आपला अपराध माफ करविला जाऊ शकत असेल तर करवून घ्यावा आणि जर तो मरण पावल्यामुळे अथवा तो कोठेतरी दूरवर गेल्यामुळे माफीसाठी जागाच उरली नसेल तर त्याच्याकरिता माफीच्या प्रार्थनेव्यतिरिक्त दुसरा मार्गच उरत नाही.
    माननीय आएशा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘मृतांना वाईट बोलू नका कारण ते आपल्या कर्मांपर्यंत पोहोचलेले आहेत.’’ (हदीस : बुखारी)

माननीय सहल बिन असद (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जर एखादा मनुष्य आपल्या मुखाची आणि आपल्या लज्जास्थानाच्या रक्षणाची हमी देत असेल तर मी त्याच्यासाठी स्वर्गाची हमी देतो.’’ (हदीस : बुखारी)

स्पष्टीकरण : मनुष्याच्या शरीरात हे दोन धोकादायक व दुर्बल जागा आहेत जेथून शैतानाला हल्ला करण्यात खूपच सवलत मिळते. अधिकांश पाप याच दोन ठिकाणांहून घडतात. जर कोणी शैतानाच्या हल्ल्यापासून त्यांचा बचाव करील तर उघड आहे की त्या मनुष्याचे राहण्याचे ठिकाण स्वर्गच (जन्नतच) असेल.
    माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘दास एक गोष्ट मुखावाटे काढतो ची अल्लाहला खूश करणारी असते. दास त्याच्याकडे लक्ष देत नाही (म्हणजे त्याला महत्त्व देत नाही), परंतु अल्लाह त्या गोष्टीमुळे त्याच्यावर कृपा करतो. अशाप्रकारे मनुष्य अल्लाहला नाराज करणारी गोष्ट मुखाने निष्काळजीपणाने काढतो जी त्याला नरकात ढकलून देते.’’ (हदीस : बुखारी)
स्पष्टीकरण : पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या या वक्तव्याचा अर्थ आहे की मनुष्याने आपल्या जिव्हेला स्वच्छंद सोडू नये, जो काही उच्चार करील विचारपूर्वक करील. अशी वाणी मुखावाटे काढू नये जी नरकात घेऊन जाणारी असेल.
पैगंबर मुहम्मद (स.) यांचे आवाहन काय होते?
    माननीय इब्ने अब्बास (रजि.) यांच्या कथनानुसार, हरकलने अबू सुफियानला विचारले ‘‘हा मनुष्य (मुहम्मद (स.)) तुम्हाला काय म्हणतो?’’ अबू सुफियानने उत्तर दिले, ‘‘हा मनुष्य आम्हाला म्हणतो की अल्लाहचे दासत्व पत्करा आणि शासन व सत्तेत कोणाला भागीदार ठरवू नका आणि तुमच्या वाडवडिलांचा जो धर्म होता आणि जे काही करीत होते ते सोडून द्या आणि हा मनुष्य आम्हाला म्हणतो की नमाज अदा करा, सत्याचा अवलंब करा, पावित्र्याने जीवन व्यतीत करा आणि नातेवाईकांची काळजी घ्या.’’ (हदीस : बुखारी)
स्पष्टीकरण : हा एका मोठ्या हदीसचा भाग आहे. ती हदीस हरकलच्या नावाने प्रसिद्ध आहे. त्याचे स्पष्टीकरण असे आहे की रोमन बादशाह हरकल बैतुल-मकदिसमध्ये होता तेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) यांचे इस्लामच्या आवाहनाचे पत्र त्याला मिळाले. त्यावेळी तो एका माहीतगार व्यक्तीचा शोध घेत होता. योगायोगाने अबू सुफियान आणि त्याचे काही सहकारी त्याला भेटले. हरकलने त्यांना अनेक प्रश्न विचारले. त्यापैकी एक प्रश्न असा होता– ‘‘या पैगंबराच्या (नबी) आवाहनाच्या मूलभूत वचने सांगा.’’ अबू सुफियान म्हणाला, ‘‘तो एकेश्वराची शिकवण देतो आणि म्हणतो की फक्त एक ईश्वराला (अल्लाहला) माना. फक्त तोच आहे ज्याची सत्ता आकाशांवर व जमिनीवर आहे. वरच्या जगाचेही तोच नियोजन करतो आणि या जमिनीवरील नियोजनदेखील त्याच्याच हातात आहे. सत्ता व नियोजनात त्याने कोणाला भागीदार बनविलेले नाही आणि कोणीही जोरजबरदस्तीने व प्रभावाने त्याचा भागीदार बनू शकत नाही. असे असल्यामुळे फक्त त्याच्याच समोर नतमस्तक व्हा (सजदा करा). प्रत्येक प्रकारच्या संकटप्रसंगी त्याचीच मदत मागितली पाहिजे. वाडवडिलांनी अनेकेश्वरत्वाच्या आधारावर जीवन व्यतीत करण्याची जी व्यवस्था बनविली आहे, तिला तिलांजली द्या. अशाप्रकारे तो आम्हाला म्हणतो की नमाज अदा करा आणि सत्याचा अवलंब करा, बोलण्यात आणि करण्यातदेखील. तसेच प्रतिष्ठा व पवित्रतेला हातातून जाऊ देऊ नका. मानवतेविरूद्ध असलेले कर्म करू नका. बांधवाबरोबर चांगला व्यवहार करा. सर्वजण एकाच आईवडिलांची संतती आहे आणि सर्व एकमेकांचे सख्खे बांधव आहेत.’’
    माननीय अमर बिन अबसा (रजि.) यांच्या कथनानुसार, मी पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडे मक्केत त्यांच्या पैगंबरीच्या सुरूवातीच्या काळात गेलो. मी विचारले, ‘‘आपण काय आहात?’’ आदरणीय मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘मी नबी (पैगंबर) आहे.’’ मी विचारले, ‘‘नबी काय असतो?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘मला अल्लाहने आपला ‘रसूल’ (संदेशवाहक) बनवून पाठविले आहे.’’ मी विचारले, ‘‘संदेश देऊन त्याने आपणास पाठविले आहे?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘मला अल्लाहने यासाठी पाठविले आहे की मी लोकांना चांगुलपणाची शिकवण द्यावी आणि मूर्तींची पूजा करणे बंद करावे आणि अल्लाहच्या एकमेवत्वाचा स्वीकार करावा आणि त्याच्याबरोबर कोणालाही भागीदार बनवू नये.’’ (हदीस : मुस्लिम, रियाजुस्सालिहीन)
स्पष्टीकरण : ही हदीसदेखील नबी (पैगंबर) च्या आवाहनाच्या मूलभूत गोष्टी सांगते. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी आपल्या आवाहनाला अल्पश: शब्दांत एकवटून सांगितले आहे, ‘‘माझे आवाहन हे आहे की अल्लाह आणि दासाच्या खNया संबंधाला योग्य आधारांवर निश्चित करणे, दास व अल्लाहच्या संबंधाची खरा पाया एकेश्वरत्व आहे. म्हणजे अल्लाहच्या सत्तेत कोणालाही सहभागी केले जाऊ नये आणि फक्त त्याचीच उपासना केली जावी, फक्त त्याचीच आराधना केली जावी आणि मानवांदरम्यान योग्य संबंधाचा पाया समान आणि एकमेकांच्या सहानुभूतीचा आहे. म्हणजे सर्व मानव एकाच आईवडिलांची संतती आहे आणि खरे तर आपसांत हे सर्व बांधव आहेत. म्हणून त्यांचे एकमेकांवर प्रेम असायला हवे. त्यांच्या सुख-दु:खात हातभार लावला पाहिजे. असहाय व लाचार बांधवांची मदत केली पाहिजे. कोणावर अत्याचार होत असेल तर सर्वांनी अत्याचाNयाविरूद्ध उभे ठाकले पाहिजे. कोणी अचानक एखाद्या संकटात सापडला असेल तर प्रत्येकाच्या मनाला धक्का पोहोचला पाहिजे आणि त्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी धावून गेले पाहिजे.

माननीय अबू बकर सिद्दीक (रजि.) यांनी ‘सूरह निसा’च्या ज्या आयतचा संदर्भ दिला आहे त्यापूर्वी अल्लाहने सांगितले आहे, ‘‘तुमच्यापूर्वी बनीइस्राईलना आम्ही आपली ठेव सोपविली होती, परंतु त्यांनी त्यात अफरातफर व बेईमानी केल्यामुळे अल्लाहचा कोप त्यांच्यावर कोसळला. जनसमुदायाच्या नेतृत्वाचा अधिकार त्यांच्याकडून हिसकावून घेण्यात आला आणि त्या काळात अनेकेश्वरत्वाचा अवलंब करणाऱ्यांची गुलामी त्यांच्या वाट्याला आली. आता तुम्हाला त्यांची जागा दिली जात आहे. तुम्हाला तत्त्वज्ञानाचा ग्रंथ आणि मोठी शासनव्यवस्था देण्यात आली आहे. खबरदार! बनीइस्राईलसारखी अफरातफर आणि बेईमानी करू नका. आम्ही ज्यांना तौरात दिला होता त्यांना उपदेश केला होता की अवज्ञा करू नका, दिलेले वचन पाळा, ग्रंथाशी अप्रामाणिकपणा करू नका, परंतु त्यांनी कृतघ्नता, बेईमानी व बंडखोरीचा मार्ग अवलंबिला त्यामुळे त्यांना वाईट परिणाम भोगावे लागले, आणि आता तुम्हाला (हे मुहम्मदचा जनसमुदाय) तुम्हाला उपदेश करीत आहोत की ईशपरायणतेच्या मार्गाचा अवलंब करा, वचनभंग करू नका, कुरआनचा मार्ग सोडून आमच्या कोपाला आमंत्रण देऊ नका.’’ आणि त्यानंतर असा उपदेश देण्यात आला की ‘‘हे ईमानधारकांनो! न्याय व निवाड्याच्या या ईशव्यवस्थेचे कोणत्याही परिस्थितीत रक्षण करा.’’
    हाच विषय शब्दांच्या थोड्याफार फरकासह ‘सूरह माइदा’ मध्येदेखील पुन्हा एकदा सांगितला गेला आहे. ‘सूरह माइदा’ अंतिम आदेशात्मक सूरह आहे. यात कायदा पूर्ण करण्यात आला आहे. यानंतर कोणताही आदेशात्मक सूरह अवतरित झाला नाही. हा सूरह अरफातमध्ये अवतरित झाला. याचे वर्णन असे आहे की जणू सरतेशेवटी जनसमुदायाकडून या मैदानात वचन घेतला जात आहे की ‘‘पाहा, ईशदेणगी पूर्ण करण्यात आली आहे. एक मोठी शासनव्यवस्था तुमच्या सुपूर्द करण्यात आली आहे. आता तुमचे कर्तव्य आहे की आम्हाला दिलेल्या वचनावर दृढ राहा अन्यथा लक्षात ठेवा, बनीइस्राईलचा इतिहास तुमच्या समोर आहे. त्यांनी वचनभंग केले तेव्हा कसे अपमानित व बदनाम झाले.’’
    ही आहे धर्मव्यवस्था आणि तिचा आदर, किमंत व महत्त्वावर दु:ख वाटते की मुस्लिम जनसमुदायाने ही व्यवस्था हातची जाऊ दिली आणि वाईट या गोष्टीचे वाटते की हा जनसमुदाय गाढ झोपेत आहे–
‘‘वाए नाकामी मता-ए-कारवाँ जाता रहा, कारवाँ के दिल से एहसास-ए-जियाँ जाता रहा.’’
जमाअत बनविणे
    माननीय अबू सईद खुदरी (रजि.) यांच्या कथनानुसार,
    पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जर तीन मनुष्य प्रवासाला निघाले तर त्यांनी आपल्यापैकी एकाला ‘अमीर’ (नेता) बनवावे.’’ (हदीस : अबू दाऊद)
स्पष्टीकरण : इस्लामी धर्मगुरू इब्ने तैमिया (रह.) म्हणतात की प्रवासादरम्यान लोकांवर जमाअत (गट, समुदाय, संघटना) बनविणे अनिवार्य करण्यात आले आहे त्यामुळे ही गोष्ट आणखीनच आवश्यक आहे की ईमानधारकांनी एक ‘जमाअत’ बनवावी, कारण त्यांची जमाअती व्यवस्था बिघडली आहे. मुस्लिमांनांसाठी एकट्याने जीवन व्यतीत करणे निषिद्ध आहे.
    माननीय अब्दुल्लाह बिन अमर बिन अल-आस (रजि.) यांच्या कथनानुसार,
    पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जंगलात राहणारे तीन माणसांनी एकेकटे राहणे अवैध आहे. त्यांनी आपल्यापैकी एकाला आपला ‘अमीर’ (नेता) बनवावा.’’ (हदीस : मुन्तका)
    माननीय मुआज बिन जबल (रजि.) यांच्या कथनानुसार,
    पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘ज्याप्रमाणे शेळ्या-मेंढ्यांचा शत्रू कोल्हा आहे आणि आपल्या कळपातून वेगळी होणाऱ्या शेळ्यांची तो सहजतेने शिकार करतो, त्याचप्रमाणे शैतान मानवाचा कोल्हा आहे. जर लोक जमाअत बनवून राहिले नाहीत तर तो त्यांना एकेकाला गाठून त्यांची सहजतेने शिकार करतो.’’ (हदीस : मुस्नद अहमद, मिश्कात)
स्पष्टीकरण : ‘‘हे लोकहो! एकएकटे राहू नका, तुमच्यासाठी आवश्यक आहे की जमाअत व सामान्य मुस्लिमांसह वास्तव्य करा.’’
    ‘‘जमाअतसह राहा’’ हा त्यावेळचा आदेश आहे जेव्हा मुस्लिमांची ‘अल-जमाअत’ अस्तित्वात असेल आणि अस्तित्वात नसेल तर काय? हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्याचे सरळ व साधे उत्तर म्हणजे जमाअत बनवा जेणेकरून ‘अल-जमाअत’ अस्तित्वात यावी.

- मुहम्मद फारूक खान -
मानवास जीवन मिळाले. त्यास या जीवनाचा अनुभव देखील होतो, मात्र असे लोक बोटावर मोजण्याइतकेच आढळतील ज्यांनी या जीवनाविषयी गांभीर्याने विचार केलेला असेल. साधारणतः मानव हा समतल आणि नाकासमोर पाहून जगण्याचा प्रयत्न करीत असतो. जीवनातील सखोल पैलूंवर विचार करण्यावर तो सहसा गांभीर्याने आपली विवेक शक्ती खर्ची करीत नसतो. याची काही स्पष्ट – अस्पष्ट कारणे आहेत.
    मनुष्य ज्या वातावरण व परिवेशात जगतो आणि त्यातील प्रचलित क्रिया कलाप व भावना वगैरेत इतका मग्न होत जातो की, त्याची पावले आपोआपच त्या दिशेत उचलली जातात आणि मग जीवनाविषयी गंभीर आणि मौलिक प्रश्नांवर विचार करण्याची त्याला सवडच मिळत नाही. परिणामी, मानव हा प्राप्त जीवनाच्या आणि जीवनाविषयीच्या मौलिक प्रश्नांना सहसा गांभीर्याने घेत नाही.
जीवन म्हणजे काय?
    जीवनाचा अर्थ काय आहे? आपण आलो कोठून आणि कोठे जाणार? जन्मापासून मृत्यूपर्यंत मिळालेल्या या अल्पशा अवधीमध्ये आपल्याला काय करावयाचे आहे? काय व्हायचे आहे? जीवन हे अभिशाप आहे की वरदान आहे? योगायोग आहे की यांच्याशी एखाद्या दायित्व अगर कर्तव्याचा संबंध आहे? आपोआप प्राप्त होणारे आहे की शोधून सापडणारे आहे? परिपूर्ण आहे की अपूर्ण आहे? सुरवात आहे की आदि ते अंतापर्यंत सर्व काही आहे? या जीवनाचा कोणी दातासुद्धा आहे की नाही? या प्रश्नांचे उत्तर कोठे सापडेल? कोण देईल? जर एखादा जीवनदाता असेलच तर त्याने या प्रश्नाचे उत्तर सुद्धा दिले की केवळ जीवन प्रदान करून समाधान मानले?
    वस्तुतः या प्रश्नांचा मानव जीवनाशी अत्यंत दृढ संबंध आहे. जगात कोणीही या प्रश्नांना जीवनाशी पृथक समजू शकत नाही. एवढेच नव्हे तर जीवनाचा आरंभच मुळात या प्रश्नांवर आधारित आहे. म्हणून या प्रश्नांवर मानव पूर्वीपासूनच विचार करीत आला आहे.   
    जीवनासंबंधी असलेल्या या प्रश्नांवर विचार करणे म्हजणे हा केवळ दार्शनिक अभिरूची आणि कल्पना विलास नसून मानवाच्या जीवंत इच्छा, आकांक्षा, कामना आणि गरजांशी याचा दृढ संबंध आहे. कारण मानव प्रत्येक गोष्टीची उपेक्षा करू शकतो. परंतु, आपल्या मनाला तो कुठे घेऊन जाईल?
मानवी मनाची प्रबळ इच्छा
    मानवी मनाची एक अत्यंत प्रबळ इच्छा अशी आहे की त्याच्या जीवनाचा कधीही अंत होता कामा नये. त्याला आपण मरावे असे मुळीच वाटत नाही. हे कधीही न संपणाऱ्या वसंत ऋतूचे स्वप्न उराशी बाळगून असतो. एकदाचा जन्म घेऊन मातीत सदासर्वदा लुप्त होण्याची त्याची मूळीच इच्छा नसते. त्याला हे आवडतच नाही की त्याच्या जीवनाचा मृत्यूच्या रूपात अंत व्हावा. म्हणूनच तो मृत्यूच्याही पलीकडे पाहण्याचा प्रयत्न करतो, मृत्यूपलीकडील रहस्याविषयी चित्र, विचित्र, विलक्षण आणि नाना-प्रकारच्या कल्पना करीत असतो.
इस पार प्रिये मधु है तुम हो, उस पार न जाने क्या होगा
    जीवनाच्या सुख, चैन, आनंदात तो इतका मग्न झालेला असतो आणि आनंदाच्या मोहपाशात तो इतका गुरफटून जातो की, त्याला या गोष्टीचा विचार करण्याची कधी सवडच मिळत नाही की, हे आनंद, हा प्रमोद आणि हा विलास कोठून प्राप्त झाला आणि किती काळ टिकणार आहे? मात्र दुःख आणि कष्ट असेल तर मात्र परिस्थिती अगदीच भिन्न असते. दुःख आणि कष्ट असल्यास माणूस मात्र या गोष्टीवर विचार करण्यासाठी विवश होतो की हे काय झाले? जो आनंद, सुख आणि प्रमोद आपल्या जीवनात होता तो का निघून गेला, कोणी व का हिरावून घेतला, हे सुख आपल्याकडे कायमस्वरूपी होते की क्षणभंगूर होते आणि शेवटी गेले तर नेहमी करिता गेले की परत आपल्याला मिळेल? मानवाचे हेच दौर्बल्य आहे आणि याच्याच परिणाम स्वरूपी तो स्वतः विषयी आणि या सृष्टीविषयी विचार करण्याची सहसा तसदी घेत नसतो. आपल्या अस्तित्व-स्त्रोताविषयी विचार करण्याच्या भानगडीत पडत नसतो. तो अशाही भानगडीत पडत नसतो की आपल्याला हे जीवन कसे आणि कोठून मिळाले, मात्र जेव्हा तो आपल्या प्रियजनांना मृत्यूशय्येवर तडफडत मरताना पाहतो तेव्हा मात्र त्याला जाग येते. अशा दुःखद परिस्थितीत त्याची हरवलेली शुद्धी परत येते. मन मस्तिष्कावरील सुख आणि मौज मस्तीची झिंग क्षणार्धात लुप्त होते. अगदी कठोर व पाषाण र्‍हृदयी व्यक्ती सुद्धा मृत्यूशी झूंज देणाऱ्या आणि मृत्यूच्या कू्र जबड्यात जगण्याचा आक्रोष करणाऱ्याची केविलवाणी अवस्था पाहून तात्काळ भानावर येते. मानसिक समाधाना करिता तिला भौतिक सुखसाधने व्यर्थ आणि निरर्थक व अस्तित्वशुन्य वाटू लागतात. मग तिच्यासमोर एक वस्तुस्थिती प्रकट होते की ”या ठिकाणी आत्मशांती व आत्मसमाधानासाठी जगातील कोणत्याही भौतिक सुखसामग्री व्यतिरिक्त कोणत्या तरी अन्य गोष्टीची आवश्यक आहे.”
    मृत्यू आणि दुःखाच्या या प्रसंगी आणखीन बऱ्याच गंभीर बाबींकडे आपले लक्ष जाते आणि हे स्वाभाविक आहे. साधारणतः आपली विवेक शक्ती जड होते आणि जीवनाच्या गहन समस्या गहन विषयाकडे आपले लक्ष जात नाही. मात्र दुःख, यातनाआणिसमस्यांच्याअनुभवामुळेविवेकशुन्यबुद्धीतचैतन्यसंचारते आणि म्हणूनच दुःख आणि यातनांच्या आरशातच माणसाला जीवनाच्या गंभीर स्वरूपाचे दर्शन घडते. सुख-शांती आणि आनंद व मौजमजेच्या वातावरणात जीवनाचा खरा अर्थ उलगडतच नाही. संवेदशनशील माणसाला मात्र निश्चितच या गोष्टीची जाणीव होते की जीवनातील सर्व प्रकारच्या सुखसुविधा उपलब्ध असून सुद्धा आणखीन असंख्य इच्छा-आकांक्षा अशा असतात ज्या पूर्ण होणे शक्य नसते. शिवाय अशा कित्येक कामना इतक्या उलट आणि आकर्षक असतात की मानवी स्वभावास त्याची उपेक्षा करणे शक्य नसते. त्या पूर्ण न होणे हे माणसाला अत्यंत दुःखद वाटतात.
    आपले प्रियजनांचे आपल्याला सोडून जाणे आणि नेहमी करिता त्यांचे दूर होणे, ही एक अशी हृदयद्रावक घटना आहे. जी सहन करणेदेखील अशक्य असते. अशा प्रसंगी माणूस पूर्णतः खचून जातो. तो नैराश्य आणि वैफल्याच्या भयानक सागरात बुडून जातो. त्याचेअंतर्मनहीगोष्टस्वीकारण्यासतयारचनसतेकीमरणारीव्यक्तीत्यालानेहमीसाठीसोडूनजातआहे. आपल्या डोळ्यांसमोर सर्वकाही घडत असताना पाहून सुद्धा नकळत त्याच्या मनात मरणाऱ्या व्यक्तीच्या पुनर्मिलनाची आशा निर्माण झालेली असते.
    बरेच जण सत्कार्यात व्यस्त असतात. त्यांचा त्याग आणि समर्पण महान असतो. मात्र त्यांच्या वाट्याला दुःख आणि अनादराशिवाय काहीही येत नाही. याउलट असंख्य दुष्कर्मी, दुष्ट व दुराचारी जीवनभर इतरांवर अन्याय व अत्याचार करीत असतात. त्यांनी लावलेल्या अन्याय व अत्याचाराच्या भयंकर आगीत मानवतेचे हवन होत असते. हे दुराचारी या आगीत असत्य आणि दुराचाराचे असे इंधन टाकीत असतात की, ही भयानक आग शतकानुशतके विझत नाही. त्यात जळणाऱ्या अन्यायग्रस्त आणि अत्याचार पीडितांचे काळीज फाडणारे अवार्त टाहो युगायुगांपर्यंत ऐकावयास मिळतो. मात्र असे दुष्ट आणि दुराचारी नेहमी मौजमजाच करीत असतात. त्यांना साधा काटाही रूतत नाही. त्यांना जीवनाचे सर्व भोगविलास भोगायला मिळतात. सर्वत्र आनंदी – आनंद आणि जीवाचे अवास्तव मागणी पुरविण्याची सामग्री उपलब्ध असते. या ठिकाणी एक संवेदनशील माणूस विचार करू लागतो की, हे काय चालले आहे? आपण काय पाहतोय? ही काय अवस्था आहे? चांगले कर्म करणाऱ्यांना आणि सदाचाऱ्यांना त्यांच्या सेवा,  पुण्य आणि सदाचाराचे काही फळ मिळेल काय?  या जगामध्ये सद्गुण आणि सदाचाराची भावना हा केवळ एक धोका तर नव्हे? पाप आणि पुण्य, सदाचार आणि दुराचार, न्याय आणि अन्याय व अत्याचारात मुळात तात्विक आणि प्रभावी फरक आहे की नाही?
    मग अशा संवेदनशील आणि विचारशील व्यक्तीच्या मनात हा प्रश्न सुद्धा निर्माण होतो की, हे जीवन आणि हे सृष्टीचक्र नेहमी व सदाकरिता चालू असेल काय? त्याला हे सुद्धा दिसते की, या जीवनसृष्टीत माणूस एकीकडे मरण पावतो तर दुसरीकडे मात्र माणसांच्या जन्माचा क्रम सुरू असतो. पशु-पक्षी आणि वनस्पतींची सुद्धा हीच अवस्था आहे. त्यांचा वंश सुद्धा चालू आहे. त्यामुळे सर्वत्र हिरवळ दिसू लागते. जीवन असण्याचा भास होतो.  पूर्ण सजीवसृष्टीने प्रस्थान केलेले असते आणि त्या ठिकाणी परत इतरांचा जन्म होतो, सर्वत्र जीवन फुललेले, बहरलेले दिसते. येथील जीवनक्रम सतत सुरू असते. मात्र हा क्रम असाच सुरू राहणार काय? लोक याप्रमाणे मरतील, त्यांच्या ठिकाणी दुसऱ्यांचा जन्म होत राहील, हा क्रम केव्हापर्यंत सुरू असेल की एकदाचा या क्रमाला कोठेतरी ब्रेक लागेल? वायु, जल, प्रकाश, ऊर्जा वगैरेंसारख्या भौतिक शक्ती अशाच प्रकारे नेहमी कार्यरत असतील का? की कधीतरी समाप्त होतील? ही विश्व व्यवस्था अशीच कार्यरत राहणार की एखाद्या निश्चित वेळेवर नष्ट होईल? मग यानंतर काय असेल? सर्वत्र फक्त पोकळीच असेल काय? की जगातील कार्यरत ऊर्जा शुन्यात विलीन होऊन नव्या जीवनाचा व नवीन विश्वाचा शुभारंभ होईल? अथवा या वर्तमान जीवनाचा मनोरम खेळ सदैवासाठी समाप्त होईल आणि मग कोणीही नसणार व काहीही नसणार? या करिता कोणीतरी बाकी राहणार काय, ज्याला या गोष्टीच्या आठवणी राहतील की या ठिकाणी एकदा कधीतरी जीवन नावाची बाब अस्तित्वात होती, येथे सजीवसृष्टी कार्यरत होती, जीवन बहरलेले आणि फुललेले होते, सुर्योदय होत होता, रात्र होताच चंद्र-ताऱ्यांची विलोभणीय चादर आकाशात मन आकर्षित करीत होती, पक्ष्यांचा कर्णमधूर चिवचिवाट होत होता, पाण्याचे खळखळणारे झरे वाहत होते. नयनरम्य दृष्य होते आणि जीवनाशी संबंधित मनोरम कथाराग-विराग व रूदन आणि हास्याची मैफल होती आणि हे सर्वकाही नेहमीसाठी नष्ट पावले.
    अथवा ही जीवनसृष्टी एकदाची अंत पावल्यावर परत एखादी प्रगतीशील व उच्चकोटीची जीवनसृष्टी अस्तित्वात येईल? जर अस्तित्वात आली तरी वर्तमान जगातील प्राणी यात दाखल होऊ शकतील काय की तेथे आपल्या व्यतिरिक्त इतर जनांचे वास्तव्य असेल? आणि जर या वर्तमान जगातील सजीवांना प्रवेश मिळालाच तर मग ते जीवन त्यांच्या वर्तमान जीवनाच्या एखाद्या पैलूचा ऋणी असेल काय? दुसऱ्या शब्दांत त्या जीवनामध्ये वर्तमान जीवनाच्या चांगल्या वाईट विचार, भाव, कर्म वगैरेंचाही आधार असेल किंवा नसेल?
    हे आणि अशाप्रकारची आणखीनही बरेच प्रश्न मानवीमन-मस्तिष्कात निर्माण होतात. मग या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर सापडणे कठीण होते किंवा समाधान होऊन जाते अथवा न झाल्यास त्याच्या नशिबी नैराश्य येते. एखाद्या वैफल्यग्रस्त माणसाप्रमाणे त्याची मनोवृत्ती होत असते. या निराश मनोवृत्तीमुळे तो जीवनातील प्रत्येक चांगल्या वाईट बाबींशी समझोता करून जीवनाचा गाडा रेटत असतो. मिळेल ते स्वीकारीत असतो, न मिळाल्यास प्रयत्न करीत असतो आणि प्रयत्नानंतर ही मिळत नसेल तर मात्र समझोता आणि सबुरीने घेत असतो. म्हणूनच अशा मानसिक अवस्थेत अडकून तो याच वर्तमान जीवनावर आणि मिळेल त्याव समाधान मानून याच जीवनास प्रथम व अंतिम आणि सर्व काही समजून बसतो आणि याच विचार व समाधानाच्या आधारे जीवन जगत असतो, जीवनास आकार देण्याचा प्रयत्न करीत असतो. त्याला याच वर्तमान जीवनाचे सुख-दुःख वाटतात. याच जीवनातील प्राप्त होणाऱ्या यशास अंतिम यश आणि अपयशास अंतिम अपयश समजत असतो त्याच्या दृष्टीत याच जीवनातील यशापयश, सुखः दुख आणि जीवनातील चढउतारा शिवाय आणखीन कोठेही कशाचेच अस्तित्व नसते.    
    भविष्याकडून निराश झाल्यावर सुद्धा माणसाच्या समस्यांचा अंत होत नसतो. हे जरी मान्य केलेकी, हेच जीवन अंतिम जीवन आहे आणि यानंतर काहीही नाही. तरी सुद्धा हा प्रश्न बाकी राहतोच आणि उत्तराची मागणी करतो की सद्भावना, पुण्य आणि सदाचारासारख्या गोष्टी एखाद्या कविचा कल्पना विलास आहे? येथे संपत्ती आणि धनाला किंमत आहे मात्र माणसाला कवडी किंमत नाही. मग त्या जगाची अवस्थाही अशीच दयनीय आणि शोचनीय असेल काय की यापेक्षा भिन्न असेल? अथवा ही भिन्नता वर्तमान जीवनाचे विरोधात्मक रूप नसून विकासात्मक रूप असेल काय? (क्रमशः)
(उर्दूतून मराठी भाषांतर सय्यद जाकीर अली)

- निसार मोमीन, पुणे.
‘‘कुरआनमध्ये म्हटले आहे की, ‘मी मातीपासून एक मानव बनविणार आहे. मग त्याला पूर्णपणे बनविन आणि त्यात माझा आत्मा फुंकीन. तेव्हा तुम्ही त्याच्यासमोर नतमस्तक व्हा.’’ (कुरआन ३८:७१-७२) याचा अर्थ मनुष्यात जो आत्मा फुंकला गेला आहे तो खरे  तर ईश्वरी गुणाचे एक प्रतिबिंब किंवा छाया आहे. जीवन, ज्ञान, सामर्थ्य, निश्चय, अधिकार आणि इतर सर्व वैशिष्ट्ये मनुष्यात सापडतात. त्यांचा सर्वांचा मिळून आत्मा बनतो. मनुष्यरूपी आत्म्याचा सन्मान व्हावा.’’ (शोधन,११-९- २०१७)
वास्तविक अल्लाहने ‘स्वत:चा’ आत्मा आदममध्ये फुंकला नाही तर ‘स्वनिर्मित’ आत्मा फुंकला. कुरआनचे भाषांतर ‘अहसनुल  कुरआन’मध्ये आहे की, याचा अर्थ तो आत्मा ज्याचा स्वामी मी (अल्लाह) आहे, माझ्याशिवाय त्यावर कुणी अधिकार बाळगीत नाही.  नि:संशय अल्लाहचे दैवी गुणधर्म (अस्मा व सिफात) विश्वातील कोणतीही सजीव-निर्जीव वस्तू धारण करू शकत नाही. कारण  अल्लाहच्या दैवत्वात कुणी भागीदार नाही, जे कुणी याभागीदारीचा दावा करतात ते ‘मुश्रिक’ आहेत आणि या भागीदारीला ‘शिर्क’  म्हणतात, जो घोर अपराध आहे, ज्याला अल्लाह कधीच माफ करीत नाही. काही सूफी मताचे लोक अल्लाहच्या दैवी गुणधर्मांना  मनुष्यात असण्याचा प्रसार करतात, त्याला ते छाया, सया, प्रतिबिंब आदी विशेषणे लावून आपल्या खोट्या श्रद्धेचा प्रचार करतात. त्याला ते ‘वहदतुल वजूद’ (प्रत्येक गोष्टीत / वस्तूत ईश्वराचा अंश असणे) आणि ‘हुलूल’ (माणसाने ईश्वरामध्ये प्रवेश होणे)  म्हणतात. हा अकीदा (श्रद्धा) इस्लामच्या मूलभूत श्रद्धेविरूद्ध आहे. हा अकीदा खऱ्या ‘अहले सुन्नत वल जमात’चा अजिबात नाही.  कुरआनच्या आयतींचा अन्वयार्थ व भ्रष्टीकरण झालेले स्पष्टीकरण होय. जर अल्लाह एखाद्या जीवंत वा मृत वस्तूत प्रवेश करीत  असेल किंवा मनुष्याचे अल्लाहत प्रवेश होणे असेल तर तौहीदचा अर्थ काय? तौहीद म्हणजे एकेश्वरवाद. अल्लाहच एकमेव ईश्वर  आहे, त्याचा कोणी भागीदार नाही. याचा अर्थ काय? सूफी याचे सप्रमाण उत्तर देत नाहीत, तर आमच्यावर शरियत बांधिल नसून  आम्ही आमच्या स्वत:च्या इबादतीच्या पद्धती शोधून काढल्या आहेत, ज्याद्वारे (तरीकात) प्राप्त करीत असतो. वास्तविक महान  अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) यांनी आणलेली शरियत संपूर्ण जीवनात व मानवजातीकरिताच आहे. सूफी त्यातून अलीफ कसे? मानवजातीला सरळमार्ग केवळ आणि केवळ शरियतच देऊ शकते आणि त्याद्वारेच मानवाचा मोक्ष (जन्नत) आहे. हे सत्य कोणी  नाकारू शकत नाही.
लेखक पुढे लिहितात की, ‘‘जीवन, ज्ञान, सामथ्र्य, निश्चय, अधिकार आणि इतर सर्व वैशिष्ट्ये मनुष्यात सापडतात. त्यांचा सर्वांचा  मिळून आत्मा बनतो. मनुष्यरूपी अल्लाहचा सन्मान व्हावा.’’ पवित्र कुरआन व हदीस ग्रंथात असे एखादे सप्रमाण वचन आले आहे  का, ज्यात आत्म्याची व्याख्या वर दिल्याप्रमाणे असावी? जर नसेल तर ती एक मानवी कल्पना व मानवनिर्मित अंदाजच म्हणावा लागेल. आत्मा व मनुष्य या दोन विभक्त गोष्टी आहेत. लेखकाने ‘मनुष्यरूपी आत्मा’ ही संज्ञा वापरली आहे. ती आक्षेपार्ह वाटते.  कारण मनुष्य आत्म्याचे रूप घेत नाही ना आत्मा मनुष्याचे रूप घेतो. मनुष्य मरण पावल्यावर केवळ शरीर उरते. आत्मा मात्र  वेगळा होतो. आत्म्याविषयी पवित्र कुरआनमध्ये आणि हदीसमध्ये जे काही वर्णन आले आहे तेवढीच माहिती शरियतनुसार अधिकृत  आहे. यहुद्यांनी जेव्हा एकदा आत्म्याविषयी प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याकडे विचारणा केली तेव्हा ‘बनी इस्राईल’ या सूरहमध्ये आयत  अवतरली. (हदीस सही बुखारी) ‘‘आणि हे लोक तुम्हाला आत्म्यासंबंधी प्रश्न विचारतात, तुम्ही उत्तर द्या की आत्मा माझ्या पालनकर्त्याच्या हुकूमाने आहे आणि तुम्हाला जे ज्ञान देण्यात आले आहे ते अत्यल्प आहे. (कुरआन १७:८५) पवित्र कुरआनचे भाष्यकार मुहम्मद जूनागढी यांनी ‘अहसानूल बयान’मध्ये या आयतीचे वर्णन करताना लिहिले आहे की, या आयतीचा अर्थ हा आहे की तुमचे ज्ञान अल्लाहच्या ज्ञानाच्या तुलनेत फारच अल्प आहे आणि हा आत्मा ज्याच्या बाबतीत तुम्ही विचारत आहात त्याचे ज्ञान  तर अल्लाहने प्रेषितांसमवेत कुणालाच दिले नाही. बस्स! इतके समजा की, हा माझ्या पालनकत्र्याचा हुकूम आहे आणि माझ्या पालनकर्त्याच्या महानतेपैकी आहे, ज्याचे सत्य केवळ तोच जाणतो.

-एम. एम. शेख
अल्लाहतआला, जो सर्वशक्तिमान आहे, जीवसृष्टीचा निर्माता आणि पालनकर्ता आहे. अल्लाहतआलाने या सृष्टीमध्ये अनेक जीवांची निर्मिती केली. जमिनीवर, आकाशात आणि समुद्रामध्ये- पशू, पक्षी, जलचर जीव इत्यादी. परंतु या संपूर्ण जीवांमध्ये मानवी जीवनाला सर्वश्रेष्ठत्व अल्लाहने प्रदान केले. मानवी जीवन एकदाच आहे. पुन्हा पुन्हा जीवन मिळत नाही, हे कुरआनने प्रभावासह स्पष्ट केले आहे. अशा अमूल्य मानवी जीवनासंबंधी कुरआनने अत्यंत स्पष्टपणे मार्गदर्शन केले आहे.

अल्लाहचे प्रेषित ह. मूसा (अ.) यांच्या जनसमूहाला संबोधन करून त्यांना आदेश देण्यात आला आहे.
‘‘ज्याने एखाद्याचा नाहक खून केला (त्या मृत व्यक्तीने एखाद्याचा खून किंवा पृथ्वीतलावर उपद्रव (फितना) माजविण्याचे कृत्य केले नव्हते तर त्याने (खून करणाऱ्याने) जणू समस्त मानवजातीला ठार मारले. आणि जर एखाद्याने कोणाला जीवनदान दिले त्याने जणू काही समस्त मानवजातीला जीवन प्रदान केले.’’(दिव्य कुरआन, सूरह माइदा, आयत क्र. ३२)
मानववंश टिवूâन राहण्यासाठी एक दुसऱ्याच्या प्राणाचा आदर प्रत्येकाच्या मनात असणे आवश्यक आहे. प्रत्येकाने एक दुसऱ्याच्या जीवनरक्षणाची भावना बाळगणे अत्यावश्यक आहे. जो कोणी अकारण एखाद्याची हत्या करतो तेव्हा तो फक्त एकावरच अत्याचार करीत नाही, तो खुनी दुसऱ्याची नाहक हत्या करून सिद्ध करतो की जीवनाच्या आदरसन्मानाने त्याचे हृदय रिक्त आहे. त्याला मानवी सहानुभूती नाही. म्हणूनच तो संपूर्ण मानवतेचा शत्रू आहे. नाहक हत्या करून तो समस्त मानवजातीविरूद्ध पाऊल उचलतो. खरे महत्त्व प्राणाची कदर आहे. मनुष्य हत्या करतो तेव्हा त्याच्या मनात मनुष्यप्राणाविषयी आदर शिल्लक राहत नाही. अशा अवस्थेतील मनुष्य संपूर्ण मानवजातीसाठी धोकादायक ठरतो. अशा व्यक्तीमध्ये असलेला दुर्गुण इतर मानवांत येत असेल तर संपूर्ण मानवजात नष्ट होऊन जाईल. याविरूद्ध जो मनुष्य एखाद्या मानवाचा जीव वाचवितो, इतरांच्या जीवाचे रक्षण करतो, तो खरे तर समस्त मानवजातीचा आदर करणारा आहे. कारण त्यात जे वैशिष्ट्य सापडते त्यावरच मानवता टिकून आहे.
मानवामध्ये खुनशी वृत्ती का आणि कशी उद्भवते? याचे स्पष्टीकरण कुरआनने स्पष्टपणे उघड केले आहे. आद्य मानव ह. आदम (अ.) हे प्रथम प्रेषित होते. त्यांना दोन पुत्र होते. ‘तौरात’ ईशग्रंथात त्यांची नावे काईन (काबील) आणि हाबील आहेत. मानवजातीच्या आरंभकाळातील एका महत्त्वपूर्ण घटनेचा उल्लेख तौरात (बायबल) मध्ये आहे. परंतु त्यातील बोधप्रद भाग नाहीसा करण्यात आला आहे. दिव्य कुरआनने या घटनेचे काहीही उणेअधिक न करता वर्णन केले आहे, त्याच्या उद्दिष्टासह स्पष्ट केले आहे.
‘‘आणि जरा यांना आदम (अ.) च्या दोन मुलांची गोष्टदेखील पूर्णपणे ऐकवा. जेव्हा त्या दोघांनी (आदमपुत्रांनी) कुर्बानी दिली तेव्हा त्यांच्यापैकी एकाची कुर्बानी स्वीकारली गेली. दुसऱ्याची स्वीकारली गेली नाही. त्याने सांगितले, ‘‘मी तुला ठार मारीन.’’ त्याने उत्तर दिले, ‘‘अल्लाह तर पापभीरू लोकांच्याच भेटी स्वीकारतो. जरी तू मला ठार मारण्यासाठी हात उचलशील तरी मी तुला ठार मारण्यासाठी हात उचलणार नाही.’’ मी समस्त विश्वांचा स्वामी, पालनकर्ता अल्लाहच्या प्रकोपाला भितो.’’ (कुरआन, सूरह माइदा, आयत २७)
काबीलच्या मनात मत्सर निर्माण झाला की हाबीलची कुर्बानी कशी स्वीकृत झाली व त्याची स्वत:ची कुर्बानी का स्वीकृत झाली नाही. या मत्सरापायीच त्याने आपल्या निरपराध भावाला ठार मारले. यावरून निष्पन्न होते की मत्सर असा भयंकर रोग आहे, जो माणसाला हत्येसारख्या घोर अपराधाकरिताही उद्युक्त करतो.
पृथ्वीवर हे पहिले मानवी रक्त होते जे जमिनीवर सांडले गेले होते. त्याच्या रक्तपाताच्या पापात, आदम (अ.) चा पहिला पुत्र सहभागी होतो, कारण तो पहिला मनुष्य आहे ज्याने हत्येची पद्धत प्रचलित केली. (हदीस : मुस्लिम किताबुल कसास)
कुरआनमध्ये या ऐतिहासिक घटनेचा उल्लेख करण्याचा मूळ उद्देश यहुदी लोकांच्या कटकारस्थानांवर सूक्ष्म दृष्टीने निंदा करणे आहे, जे त्यांनी इस्लामचे अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) व त्यांच्या प्रतिष्ठित सहाबा (सहकारी) यांना ठार मारण्यासाठी केले होते. (कुरआन, अध्याय ५, आयत ११)
आज जगात सर्वत्र द्वेष, मत्सर याचा मोठा पगडा रिवाज आहे. त्यामुळे क्षुल्लकशा कारणामुळे माणूस माणसाला ठार मारण्यासाठी उद्युक्त होत आहे. अशा लोकांची अत्यंत कठोर शब्दांत निर्भत्र्सना करीत कुरआन आदेश देतो की,
जे लोक अल्लाह आणि त्याचे पैगंबर यांच्याशी युद्ध करतात आणि पृथ्वीवर उपद्रव माजविण्याकरिता हिंसाचार माजवतात, त्यांची शिक्षा ही आहे की ते ठार मारले जातील, अथवा सुळावर चढविले जातील अथवा परस्पर विरूद्ध दिशेने त्यांचे हातपाय कापले जातील अथवा त्यांना देशांतर करावयास लावले जाईल. हा अपमान व नामुष्की तर त्यांच्यासाठी दुनियेत आहे आणि मरणोत्तर जीवनामध्ये त्यांच्यासाठी याहून मोठी शिक्षा आहे.’’ (कुरआन, सूरह ५, आयत ३३)
शेवटी सर्वशक्तिमान अल्लाहकडे मी दुआ करतो की, समस्त मानवांना सुबुद्धी दे. एकमेकांच्या जीवनाचा आदर, रक्षण करण्याची सद्गती दे.
अल्लाहच्या आदेशानुसार (दिव्य कुरआन) आणि अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या कृतिशील जीवनानुसार (सुन्नत) प्रत्येकाला जीवन जगण्याचे मार्गदर्शन प्राप्त होवो. द्वेष, मत्सर, हिंसाचारापासून मुक्ती मिळो. (आमीन)

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Theme images by 5ugarless. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget